आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Three Terrorists Killed In Encounter With Police In Jammu And Kashmir's Sopore, Police Recovered Arms And Ammunition

जम्मू-काश्मीर:बारामुल्लामध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काश्मीर झोनच्या पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले की, या वर्षी पोलिसांनी 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये मंगळवारी सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळाही जप्त केला आहे. तसेच पोलिसांनी चकमक संपल्याची माहिती दिली आहे.

सोपोर भागातील पेठसीरमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती, त्यानंतर सोमवारी रात्री येथे शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी सकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली होती.

सुरक्षा दलांच्या मते, या दहशतवाद्यांची आणि त्यांच्या दहशतवादी गटाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक म्हणाले की, या वर्षी पोलिसांनी 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

सोमवारी श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सोमवारी पोलिसांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. दोन्ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेझिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेचे होते. चकमकीच्या ठिकाणाहून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एक अब्बास शेख आहे, जो लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख कमांडर आणि टीआरएफचा स्वयंघोषित प्रमुख होता. दुसरा दहशतवादी साकीब मंजूर होता, जो अब्बास शेखचा डेप्युटी होता. दोन्ही दहशतवादी श्रीनगरमधील अलूची बाग येथे मारले गेले.

बातम्या आणखी आहेत...