आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Three way Election After 3 Decades, Congress And Aam Aadmi Party Challenge BJP, Which Has Been In Power For 27 Years In Gujarat

3 दशकांनंतर तिरंगी निवडणूक:गुजरातेत 27 वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपसमोर काँग्रेससह आम आदमी पक्षाचे आव्हान

अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातेत दोन मोठे पक्ष भाजप आणि काँग्रेसमध्ये आतापर्यंत पारंपरिक सामना होत आला आहे. तीन दशकांनंतर पहिल्यांदाच आम आदमी पक्षही आता मैदानात उतरणार आहे. यापूर्वी १९९० मध्ये जनता दलाने तिसरा पक्ष म्हणून सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या.

राज्यात १९९५ नंतरपासून भाजप अजिंक्य आहे. यंदा त्यांच्यासमोर काँग्रेसशिवाय आम आदमी पक्षाचेही आव्हान आहे. गेल्या दोन महिन्यांत १०० पेक्षा जास्त जागांसाठी ‘आप’ने उमेदवार घोषित केले आहेत. त्यांनी १६ जागा असलेल्या सूरत आणि ५४ जागांच्या सौराष्ट्र-कच्छ भागावर फोकस केला आहे. पालिका निवडणुकीत सूरतचे १२० पैकी २७ वाॅर्ड जिंकले होते. तर येथील सर्व १६ विधानसभा जागांवर भाजपचे आमदार आहेत. सौराष्ट्र-कच्छ भागात भाजप-काँग्रेसमध्ये काट्याची टक्कर असते. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने इथे ३०, तर भाजपने २३ जागा जिंकल्या होत्या

एका मतदारासाठी गिरच्या जंगलात बूथ, शिपिंग कंटेनरमध्येही केंद्र निवडणुकीत भडोच जिल्ह्यातील अलिया बेटच्या २०० लोकांसाठी शिपिंग कंटेनरमध्ये मतदान केंद्र बनवले जाईल. या बेटावर एकही सरकारी इमारत नाही. अशाच प्रकारे गिरच्या जंगलात एकमेव मतदार भारतदास दर्शनदास यांच्यासाठीही बूथ बनवले जाईल.

एक्‍स्‍प्लेनर हे पाच घटक बदलू शकतात गुजरात विधानसभा निवडणुकीचे चित्र

{राज्यामध्ये तिन्ही प्रमुख पक्षांचे काय धोरण राहील? भाजपचा चेहरा पीएम नरेंद्र मोदी आणि आपचा अरविंद केजरीवाल आहेत. आम आदमी पक्ष सीएम चेहऱ्याची घोषणा शुक्रवारी करू शकतो. तर काँग्रेसने राजस्थान मॉडेल समोर ठेवले आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसने मोदींसमोर राहुलना पुढे केले होते. {यंदा निवडणूक कशी वेगळी आहे? २०१७ मध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्वात पाटीदार आंदोलन, अल्पेश ठाकूरच्या नेतृत्वात ओबीसी आंदोलन, जिग्नेश मेवानीच्या नेतृत्वात दलित हक्क आंदोलन गाजले होते. यामुळे राज्य सरकारविरोधात आक्रोश होता. यामुळे जातीआधारित राजकारणाला हवा मिळाली. परिणामी भाजप केवळ ९९ जागा जिंकू शकला. ही पक्षाची २७ वर्षांतील सर्वात खराब कामगिरी होती. {लागोपाठ सत्तेत राहणे हानिकारक किंवा लाभदायक आहे? २०१७ मधील विजयानंतर विजय रूपाणी मुख्यमंत्री झाले. मात्र, सरकार कोविडचा सामना करण्यात अपयशी ठरल्याची लोकांची भावना कोविड काळात होती. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाने सरकारचा चेहरा बदलला. पाटीदार समुदायातील भूपेंद्र पटेल यांना सीएम केले. तथापि, पुन्हा सत्ताविरोधी लाट पाहता मोदींनी स्वत: कमान सांभाळली आहे. अलिकडेच त्यांनी ५ वेळा गुजरात दौरा केला. {‘आप’मुळे काय फरक पडेल? गेल्या निवडणुकीत राज्यात तिसरा पक्ष वातावरण तयार करू शकला नाही. यंदा ‘आप’ने मोफत वीज, कर्जमाफी आदी आश्वासने देत भाजप-काँग्रेसला धोरण बदलण्यास भाग पाडले आहे. {निवडणुकीचे मुद्दे काय असतील? २०१७ मध्ये आंदोलनांचे वर्चस्व होते. सध्या पेट्रोल-डिझेल आणि इतर जीवनावश्यक वस्तुंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. निवडणुकीत महागाई, बेरोजगारी आदी समस्या मोठा मुद्दा आहे.

बातम्या आणखी आहेत...