आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बनावट TRP केसमध्ये अटक करण्यात आलेल्या पाचमधील तिघांनी मजिस्ट्रेटसमोर रिपब्लिक टीव्हीच्या अधिकाऱ्यांचे नाव घेतले आहे. त्यांनी म्हटले की, हे लोक व्हूअरशिप वाढवण्याच्या खेळात सामिल आहेत. तिन्ही आरोपींनी स्वतःला एका रॅकेटचा भाग असल्याचे सांगितले आणि म्हटले की, ठराविक चॅनल पाहण्याच्या बदल्यात लोकांना पैसा दिला जात होता. एका इंग्री वृत्तपत्रासोबत झालेल्या बातचितमध्ये मुंबई पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांनी या गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की, या तिन्ही आरोपींना कोर्टात साक्षिदार म्हणून सादर केले जाईल.
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना परमबीर सिंग म्हणाले की, दुसर्या साक्षीदारानेने बॉक्स सिनेमाविरोधात विधान केले. ज्या तीन आरोपींनी जबाब दिली आहेत त्यापैकी एक हंसा रिसर्चचा कर्मचारी देखील आहे. पोलिस आयुक्तांनी सांगितले की सीआरपीसीच्या कलम 14 अन्वये निवेदने नोंदवण्यात येत असून त्यामध्ये दंडाधिकाऱ्यांसमोर चौकशी केली जाते.
रिपब्लिकच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची झाली चौकशी
यापूर्वी गुरुवारी सहाय्यक निरीक्षक सचिन वाजे यांनी रिपब्लिक टीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक अभिषेक कपूर यांची तीन तास चौकशी केली. बुधवारी वाहिनीचे कार्यकारी संपादक निरंजन नारायण स्वामी यांचे निवेदन नोंदवण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने अर्णबची याचिकेच्या सुनावणीस दिला नकार
गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने अर्णब आणि रिपब्लिक टीव्हीने दाखल केलेल्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला आणि त्यांना उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. या याचिकेत पोलिस समन्सवर स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड म्हणाले, 'आम्हाला उच्च न्यायालयावर विश्वास ठेवायला हवा. हायकोर्टाच्या हस्तक्षेपाशिवाय सुनावणी चुकीचा संदेश देते.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.