आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्यप्रदेशातील छतरपुर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने परिक्षेचा अभ्यास न झाल्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. गणित पेपर देण्यापूर्वीच या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित अमित ताम्रकार (वय. 17) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो इयत्ता दहावीत शिकत होता. सुमितचा आज गणिताचा पेपर होता मात्र, त्याचा अभ्यास न झाल्याने त्याला टेंशन आले होते. सकाळी त्याचे आई-वडिलांनी त्याच्या खोलीमध्ये पाहिले असता, सुमितने गळफास घेत आत्महत्या केली होती. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, शवविच्छेदनासाठी सुमितचा मृतदेह नेण्यात आहे. त्यांच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, परिक्षेच्या तणावाने त्याने आत्महत्या केली.
गेल्या काही दिवसांपासून होता तणावात
सुमित हा छतरपुर येथील हनुमान टोरिया येथील शिव कॉलोनी येथे राहत होता. तो इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता. त्याचा आज गणिताचा पेपर असल्याने तो गेल्या दोन दिवसांपासून तणावात होता. एका नातेवाईकाने सांगितले की, वर्षभरापासून, विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करत आहेत, मात्र आता ऑफलाइन परिक्ष होत असल्याने विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत. सुमितचे देखील अभ्यास कमी झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुमित तणावात होता.
रात्री उशिरापर्यंत केला अभ्यास
रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही जागेच होतो. तेव्हापर्यंत तो आपल्या परिक्षेचा अभ्यास करत होता. सकाळी त्याने दररोज प्रमाणे 4 वाजेचा अलार्म देखील लावला होता. असे त्यांच्या आईने सांगितले. अलार्म वाजल्यानंतरही तो न उठल्याने त्यांच्या आईने पाहिले असता. सुमित त्याच्या रुममध्ये नव्हता. त्यानंतर त्याच्या आईने दुसऱ्या रुममध्ये जाऊन बघितले असता, त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळले. पोलिसांनी सांगितले की, त्याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सुमितने हा पाऊल का उचलले, याचे कारण सध्या अस्पष्ट आहे. मात्र त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, तो अभ्यासामुळे तणावात होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.