आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tiger Kills Many People From Tribal In Sunderban, People Are Deprived Of Compensation Due To Hidden Death Toll

दिव्य मराठी विशेष:सुंदरबनमधील वनवासी समुदाय ठरतो वाघांचे भक्ष्य, मृतांची आकडेवारी दडवल्याने लोक नुकसान भरपाईपासून वंचित

अमरेंद्र किशोर | कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • खाऱ्या पाण्याने शेतीची हानी, मासे-मधमाशांमुळे केवळ संरक्षित वनक्षेत्राचा आसरा

पश्चिम बंगालच्या दक्षिण-२४ परगना जिल्ह्यातील सुंदरबन. एक जूनच्या सकाळी चारगेरी गावातील अतीन मंडल पत्नी भगवतीसोबत कालीचक वनक्षेत्रात मासेमारीसाठी जातात. साडेसातच्या सुमारास झुडपात दडलेला नरभक्षक वाघ भगवतीवर झडप घालतो. अर्थात ती त्याचे भक्ष्य ठरते. ९ जून रोजी झिलाच्या जंगलात खेकडे पकडण्यासाठी गेलेले कुमिरमारी गावातील सुनील सरदार देखील वाघाच्या हल्ल्यात मारले गेले. वाघाने सुनील यांच्या मानेला जबड्यात धरले होते. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही, असे प्रत्यक्षदर्शी कार्तिक यांनी सांगितले. गेल्या महिन्यातील वादळानंतर तीन लोक वाघाचे सावज ठरले. या भागात वाघ व माणूस यांच्यातील संघर्ष दीर्घकाळापासून सुरू आहे. सरकारी आकड्यात गेल्या दोन दशकांत केवळ २० मासेमारांचा नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची नोंद आहे. परंतु मृतांची संख्या खूप जास्त असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या भागात पीडितांसाठी काम करणाऱ्या संस्थेच्या म्हणण्यानुसार वाघांनी सुंदरबनच्या ५२ टापूंवरील समुदायाच्या वस्तीवर हल्ले केले. तेथे पाच हजार विधवा राहतात.

नरभक्षी वाघांच्या हल्ल्यांत त्यांचे कुंकू पुसले गेले आहे. मृतांची संख्या सरकार नव्हे तर स्थानिक लोक दडवून ठेवतात, ही गोष्ट आश्चर्य वाटणारी आहे. वास्तविक गंगेच्या कुशीतील सुंदरबनाची आेळख ‘आठेरो भाटेर देश’ अशी आहे. म्हणजेच १८ वेळा ज्वार उगवत असलेला प्रदेश अशी आहे. परंतु प्रत्यक्षात हा भाग खारपाटाचा आहे. दर महिन्याला जंगलात मध गोळा करताना ८-१० जण वाघाचे भक्ष्य ठरतात, असे स्थानिक लाेकांचे म्हणणे आहे. वाघापासून सुटका करून घेणाऱ्यांवर दलदलीतील मगरीचे शिकार व्हावे लागते. सुंदरबन फाउंडेशनचे सचिव प्रसेनजित मंडल म्हणाले, लोकांच्या जीवन-मृत्यूची विचित्र कारणे व आकडेवारी हे सर्व गुंतागुंतीचे बनले आहे. नरभक्षी वाघांचा परिसर आहे. सध्या सुंदरबनची लोकसंख्या ४५ लाखांवर आहे.

१९ वर्षांत ३३४ वाघ गायब
सुंदरबनमध्ये वाघांच्या संरक्षणासाठी सक्रिय अनिल मिस्री म्हणाले, वाघांचा रहिवास असलेली ठिकाणे माणसांसाठी प्रतिबंधित आहेत. याच भागात सर्वात शुद्ध अशा स्वरूपाचा मध मिळतो. त्यावर मोठ्या समुदायाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. मात्र अशा लोकांवर वाघाची नजर पडते तेव्हा त्यांच्या हल्ल्यात लोक प्राण गमावतात. या क्षेत्रात केवळ १०६ वाघ आहेत. २००२ मध्ये ४४० वाघ होते. १९ वर्षांत ३३४ वाघ गायब झाल्याचे गोसाबाचे विकास अधिकारी रुणित सेन यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...