आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीतील तिहार कारागृहातील शौचालयांना दरवाजेच नसल्याची गंभीर बाब एका कैद्याच्या पत्रातून झाला आहे. दिल्ली हाय कोर्टाने सोमवारी या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली सरकारला नोटीस बजावली.
दिल्ली हाय कोर्टाने सोमवारी तिहार तुरुंगात स्वच्छ पाणी, टॉयलेट्सचे दरवाजे व चांगल्या सुविधा उपलब्ध करवून देण्याची मागणी करणाऱ्या एका जनहित याचिकेवर सुनावणी केली. मुख्य न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा व न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने हा एक मानवीय मुद्दा असल्याचे स्पष्ट केले. तसेच दिल्ली सरकारला नोटीस बजावून 6 आठवड्यांच्या आत प्रत्युत्तर मागवले. या प्रकरणी आता 14 एप्रिल 2023 रोजी सुनावणी होईल.
दिल्ली हाय कोर्ट लीगल सेवा समितीने (DHCLSC) एका कैद्याचे पत्र मिळाल्यानंतर ही जनहित याचिका दाखल केली होती. DHCLSC च्या एका पॅनल वकिलाने या प्रकरणी तुरुंगात जाऊन स्थितीचा आढावा घेवून एक अहवाल तयार केला. या अहवालानुसार, तुरुंगात मुलभूत सोईसुविधांचा स्पष्ट अभाव आहे. कैद्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. वॉशरूम व त्यांचे दरवाजे मोडलेल्या स्थितीत आहेत. यामुळे कैद्यांना तडजोड करावी लागते.
तुरुंग परिसरातील मॅनहोल तुंबले
जनहित याचिकेत तुरुंग परिसरातील एक मॅनहोल तुंबल्यामुळे कैद्यांना अत्यंत दुर्गंधयुक्त वातावरणात रहावे लागत असल्याचाही दावा करण्यात आला आहे. दिल्ली तुरुंग नियम-2018 व मॉटल जेल मॅन्युअल,-2016 नुसार, कैद्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध करवून देण्याची गरज आहे. तसेच तुरुंग परिसरही स्वच्छता राखण्याची गरज आहे, असेही या याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.