आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Tika Utsav' Across The Country Today PM Modi Wrote An Article In The Name Of The Country; Said More And More People Get Vaccinated; 4 Sources Of Success In The Fight With Corona Were Also Told 

देशात आजपासून टिका उत्सव:पंतप्रधान मोदी यांचे लसीकरणासाठी अधिकाधिक लोकांना आवाहन; कोरोना लढाईच्या यशात सांगितली ही चार महत्वाची सुत्रे

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना विरुद्धच्या यशातील चार सुत्रे

देशात कोरोना महामारीमुळे नवीन रुग्णंसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 एप्रिल ते 14 एप्रिलपर्यंत देशात टिका उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, देशातील 45 वर्षावरील अधिकाधिक लोकांचे लसीकरण करणे हे टिका उत्सवाचे प्रमुख उदिष्टे आहे. लोकांना आवाहन करताना ते म्हणाले की, देशात आता प्रत्येकाने लस घेण्यासाठी पुढे यायला हवे. त्यासोबतच लस वाया जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायला हवी. कोरोना महामारीच्या लढाईमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांनी पुढील चार सुत्रांचा अवलंब करण्यास सांगितले.

माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 11 एप्रिल म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर देशाभरात आजपासून 'टीका उत्सव' सुरु होणार आहे. हा उत्सव तीन दिवस चालणार असून 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिनी याची सांगता होणार आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, हा उत्सव एक प्रकारे कोरोनाविरूद्ध दुसर्‍या मोठ्या युद्धाची सुरुवात आहे. यामध्ये आम्हाला पसर्नल हायजिन (Personal Hygiene)आणि सोशल हायजिनवर (Social Hygiene) विशेष भर द्यावे लागणार आहे.

कोरोना विरुद्धच्या यशातील चार सुत्रे

  • Each One- Vaccinate One- म्हणजे, जे लोक कमी शिकलेले आहेत, वयस्कर आहेत, जे स्वत: जाऊन लस घेऊ शकत नाही, त्यांची मदत करा.
  • Each One- Treat One- म्हणजे, ज्या लोकांकडे तेवढे साधने नाहीत, ज्यांना कमी जागरूकता आहेत अशा व्यक्तींना कोरोना उपचारात मदत करा.
  • Each One- Save One- म्हणजे, स्वत: मास्कचा वापर करत जीव वाचवणे आणि त्यासोबत इतरांचाही वाचवणे. यावर भर देणे.

आणि चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे, गावात कोणालाही कोरोना झाल्यास समाजातील लोकांनी पुढे येऊन 'मायक्रो कन्टेनमेंट झोन' तयार करायला हवे. त्यासाठी गावातील कुटुंब आणि समाजातील लोकांनी पुढे यायला हवे.

बातम्या आणखी आहेत...