आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक बँकेच्या ताज्या अहवालानूसार:भारतावर लवकरच उष्णतेच्या असह्य लाटेस तोंड देण्याची वेळ

तिरुवनंतपुरम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात प्रचंड उष्णतेच्या लाटेचे प्रमाण काही दशकांमध्ये वाढले आहे. त्याचा वेग चिंताजनक आहे. लवकरच भारताला उष्णतेच्या असह्य अशा लाटांचा सामना करावा लागू शकतो. अशा भीषण उष्णतेच्या लाटेचा सामना माणूस करू शकत नाही, अशी स्थिती पाहायला मिळू शकते, असा इशारा जागतिक बँकेच्या ताज्या अहवालातून देण्यात आला आहे.

तिरुवनंतपुरम येथे केरळ सरकारच्या सहकार्याने वर्ल्ड बँकेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय परिषदेत यासंबंधीचा अहवाल जाहीर केला जाणार आहे. ‘भारतातील हवामान बदल व विकास भागीदार’ देश या बैठकीत सहभागी होतील. वास्तविक देशाला अति उष्णतेचा सामना करावा लागत आहे. उष्णतेची लाट लवकर सुरू होते आणि दीर्घकाळ राहते, असा अनुभव भारतीयांना येत आहे. २०२२ मध्ये देशाला अशा स्थितीला वेळेच्या आधीच तोंड द्यावे लागले होते. या काळात दिल्लीचे तापमान ४६ अंश सेल्सियसवर पोहोचले होते. मार्चमध्ये पारा अचानक वाढला. तो इतिहासातील सर्वात उष्ण महिना ठरला होता.

बातम्या आणखी आहेत...