आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैयक्तिक केमिस्ट्री:पंतप्रधानांकडून ममता बॅनर्जींना 'लाल मिरची' कशी कुटावी याच्या टिप्स, मोदी-ममतांचा व्हिडिओ व्हायरल

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पी. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वैर कोणापासून लपून राहिलेले नाही. हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद लावली होती. पण, ममतांनी सत्ता कायम राखली. या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय कट्टरता असली तर व्यक्तीगत पातळीवर दोघांचीही संबंध अत्यंत चांगले असल्याचे दिसून आले आहे. दिल्लीत शनिवारी एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांची भेट झाली. यावेळी मोदी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लाल मिरचीबाबत काही टिप्स देताना दिसून आले. तर मोदींच्या टिप्स दिदीदेखील खूप लक्ष देऊन ऐकत होत्या. यावेळी त्यांच्याबाजूला भारताचे सरन्यायधीश एन. व्ही. रमण हेदेखील उभे होते.

राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्फरन्समध्ये सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जीही आल्या होत्या. विज्ञान भवनात झालेल्या संमेलनाचे उद्घाटन सत्र संपल्यानंतर चहापानाचा ब्रेक होता. यादरम्यान पीएम मोदी आणि ममता यांची भेट झाली. दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पीएम मोदी आणि ममता बॅनर्जी राजकीय व्यासपीठावर एकमेकांच्या विरोधात जितके कटुता दाखवतात, तितकेच त्यांच्यातील वैयक्तिक नातेही गोड आहे.

ममता आणि मोदी यांच्यामध्ये कितीही राजकीय संघर्ष असला तरी वैयक्तीक पातळीवर दोघांचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मीडिया रिपोर्टनुसार ममतांनी पंतप्रधान मोदींना हिमसागर, मालदा आणि लक्ष्मणभोग हे आंबे पाठवले होते. तसेच मोदींनी अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत ममता बॅनर्जी आजही आपल्याला वर्षाला दोन कुर्ते आणि बंगाली मिठाई भेट म्हणून पाठवतात असे सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...