आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tired Of Waiting! The Leader Who Went To Meet Sonia Gandhi Is Angry With The Congress Party

गुजरातमध्ये काँग्रेसला भगदाड?:फैजल पटेल काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची शक्यता, फैजल दिवंगत काँग्रेस नेते अहमद पटेल यांचे पुत्र, सोनियांनी भेट नाकारल्यामुळे झालेत नाराज

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे माजी राजकीय सल्लागार दिवंगत अहमद पटेल यांचे पुत्र फैजल पटेल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत. त्यांनी मंगळवारी एका ट्विटद्वारे सोनियांनी भेट नाकारल्यामुळे आपल्यापुढे विविध पर्याय उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते लवकरच गुजरातमध्ये चंचूप्रवेश करण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या आम आदमी पार्टीत जातील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाले तर गुजरातमधील आपले गतवैभव प्राप्त करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसला मोठे भगदाड पडण्याची भीती आहे. गुजरातमध्ये चालू वर्षाच्या अखेरिस विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे.

गत काही दिवसांपासून काँग्रेस श्रेष्ठींवर नाराज असणाऱ्या फैजल पटेल यांनी एका ट्विटद्वारे आपल्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे. त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची नुकतीच भेट घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, त्यांना वेळ देण्यात आला नाही. यामुळे फैजल यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. 'मी वाट बघून थकलो. माझ्यासाठी सर्व पर्याय उघडले आहेत,' असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या पोस्टमुळे काँग्रेस आणखी एका नेत्याला मुकणार का असा सवाल उपस्थित झाला आहे.

काय म्हणाले फैजल पटेल?

हायकंमाडकडून कोणत्याही प्रकारचे प्रोत्साहन दिले जात नाही, ना वेळ दिला जातो, मी वाट बघून थकलो आहे. मलाही पर्याय उघडे आहेत. अशी भूमिका फैजल पटेल यांनी घेतली आहे. काँग्रेसची सध्याच्या परिस्थिती पाहिली तर ही भूमिका काँग्रेस नेतृत्वासाठी धक्का मानली जात आहे, कारण अलीकडे ज्या प्रकारे अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे आणि अनेकांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे, फैजलच्या या निर्णयामुळे परिस्थिती आणखी बिघडणार आहे.

पटेल आपमध्ये सामील होणार ?

दिवगंत अहमद पटेल हे काँग्रेसचे चाणाक्य मानले जात होते. मात्र त्यांच्या मुलाने काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी 2021 मध्ये अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. यानंतर ते काँग्रेसचा हात सोडणार असून झाडू हातात घेणार असल्याची चर्चा गुजरातमध्ये रंगली आहे. फैजल सध्या भरूच आणि नर्मदा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. यात ते राजकीय परिस्थितीचे आकलन करून त्यांची टीम वाढवण्याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आगामी काही महिन्यात गुजरातच्या निवडणुका लागणार आहेत. या तयारीत काँग्रेस असताना फैजल पटेल यांनी काँग्रेसला आणखर अडचणीत आणले आहे. मागील निवडणुकामध्ये गुतजरातची धुरा संभाळलेले खासदार राजीव सातव हे यावेळी नसल्याने काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, असा अंदाज राजकीय जाणकारांनी वर्तवला आहे.

बातम्या आणखी आहेत...