आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tirupati Balaji Temple; 500 And 1000 Demonetised Notes Are Still Being Received In Donations, Requesting The Government To Change The Old Notes Of 50 Crores

जुने चलन:बालाजी मंदिरात अजूनही येत आहेत 500-1000 च्या जुन्या नोटा, तिरुपती ट्रस्टने सरकारकडे 50 कोटींचे जुने चलन बदलण्याची मागणी केली

तिरुपती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर बंद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा आजही मंदिरात दान केल्या जात आहेत. आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात मागील काही महिन्यात तब्बल 50 कोटींच्या जुन्या नोटा दान करण्यात आल्या आहेत. तिरुपती ट्रस्टचे चेअरमैन वाईवी सुब्बारेड्डी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेऊन, या जुन्या नोटा बदलून देण्याची मागणी केली आहे.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे तिरुपती बालाजी मंदिरातील दान खूप कमी झाले आहे. परंतू, 11 जूनपासून मंदिर उघडल्यानंतर फक्त एका महिन्यात मंदिरात 17 कोटी रुपयांचे दान आले. हे कोरोनापूर्वी येणाऱ्या दानाच्या 10 टक्केही नाही. यातच आता मंदिर ट्रस्टने दानमध्ये आलेल्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांतून मंदिराला आर्थिक सहाय्यता देण्याची योजना आखली आहे. या नोटा नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या नोटाबंदीच्या नंतर आल्यामुळे मंदिराला यांना सांभाळणेही कठीण झाले आहे.

मंदिराशी निगडीत एका सूत्रांने सांगितले की, या नोटा अनेक दिवसांपासून दानमध्ये येत आहेत. लॉकडाउनमुळे याबाबत कोणताच निर्णय झाला नव्हता. मंदिर ट्रस्टचे म्हणने आहे की, अशा विशेष परिस्थितीत नोटा बदलून दिल्यास मंदिराला मोठी आर्थिक सहाय्यता होईल. परंतू, मंदिर प्रशासनाकडून अर्थमंत्र्यांसोबत झालेल्या भेटीबाबत कोणताच तपशील जाहीर झाला नाही. पीआरओ टी रवीने सांगितले की, अद्याप याबाबत माहिती देण्यास मंदिराकडून नकार देण्यात आला आहे.