आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tirupati Balaji | Tirumala Tirupati Balaji Temple Assets & Property Details I Latest News And Update  

तिरुपती संस्थानने प्रथमच जाहीर केली संपत्ती:एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी; ट्रस्ट म्हणाले- 10.3 टन सोने अन् 16 हजार कोटी बँकेत जमा

आंध्रप्रदेशएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ने प्रथमच मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली आहे. माध्यमांच्या अहवालानुसार, शनिवारी मंदिराच्या वतीने श्र्वेतपत्रिका जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये मंदिराच्या राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रोख जमा असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी आहे.

2019 पासून सोने आणि रोख रकमेत वाढ
ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी ए.व्ही. धर्मा रेड्डी यांनी सांगितले की, सद्याच्या ट्रस्ट बोर्डाने 2019 पासून आपली गुंतवणूक गाईडलाईन्सला मजबूत केले आहे. 2019 मध्ये अनेक बँकांमध्ये 13,025 कोटी रोकड होती, ती वाढून 15,938 कोटी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत गुंतवणुकीत 2,900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, तिरुमला तिरुपती देवस्थानमकडे 2019 मध्ये ट्रस्टच्या शेअर्ड बँक-वायस गुंतवणुकीत 7339.74 टन सोन्याच्या ठेवी होत्या. ज्यात गेल्या तीन वर्षांत 2.9 टनांनी वाढ झाली आहे.

आंध्र सरकारच्या रोख्यांवर फंड गुंतवण्याचा दावा

  • TTD ने काही सोशल मीडिया रिपोर्ट्स फेटाळून लावल्या. ज्यात असा दावा केला होता की, ट्रस्टचे अध्यक्ष आणि बोर्ड यांनी आंध्रप्रदेश सरकारी सिक्युरिटीजवर निधी गुंतवला आहे. TTD ने सांगितले की, अशा प्रकारे आम्ही केलेले नाही. तर उर्वरित निधी हा शेड्युल्ड बॅंकामध्ये गुंतवला गेलेला आहे.
  • ट्रस्टने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, श्रीवारीच्या भक्तांना विनंती आहे की, त्यांनी अशा खोट्या प्रचारावर विश्वास ठेवू नये. बँकांमध्ये जमा केलेली रोख आणि सोन्याची गुंतवणूक अत्यंत पारदर्शक आणि योग्य पद्धतीने केली जाते.

एकूण 960 मालमत्ता 7,123 एकरात विस्तार
देणगीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुमाला तिरुपती मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात व आसपास विविध ठिकाणी 7 हजार 123 एकरात पसरलेल्या एकूण 960 मालमत्ता आहेत. चांदीपासून ते मौल्यवान दगड, नाणी, कंपनीचे शेअर्स आणि मालमत्ता यासारख्या वस्तूही येथे दान स्वरूपात मिळतात.

बातम्या आणखी आहेत...