आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरुपती:सर्वात श्रीमंत मंदिराला प्रसादातून 375 काेटी रुपये, 2937 काेटी रु.च्या अर्थसंकल्पाला मंजुरी

तिरुपतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील तिरुमला मंदिर. २०२१-२२ साठी त्याचे वार्षिक बजेट आहे - २९३७ काेटी रुपये. विशेष गाेष्ट म्हणजे मंदिर प्रशासनाला फक्त व्याजातून ५३३ काेटी आणि प्रसादामधून ३७५ काेटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तिरुमलामधील सगळ्यात श्रीमंत मंदिराचे कामकाज सांभाळणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ने शनिवारी रात्री उशिरा वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. त्यात २,९३७ काेटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली.

मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत हा अर्थसंकल्प १० टक्के जास्त आहे. टीटीडी मंडळाने २०२०-२१ मध्ये हुंडी आणि अन्य भांडवलातून १,१३१ काेटी रुपये आणि कुटिर दान याेजनेंतर्गत सेवाभावी संपत्तीसाठी १०० काेटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. प्रसादातून (लाडू) ३७५ काेटी रुपये, दर्शनातून २१० काेटी रुपये रुपये मिळण्याची शक्यता आहे.

गाय ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित : टीटीडीनेही गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी ते केंद्र सरकारलाही शिफारस करतील.

बातम्या आणखी आहेत...