आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Tirupati City Containment Zone, Total Lockdown Till 5 August, Temple Will Still Remain Open But All Ticket Tickets Closed

तिरुपतीमध्ये कोरोनाचा कहर:संपूर्ण तिरुपती शहर कंटेनमेंट झोन घोषित; 5 ऑगस्टपर्यंत शहरात टोटल लॉकडाउन, मंदिर उघडे पण सर्वदर्शन तिकीट बंद

तिरुपती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तिरुपती मंदिरातील 170 कर्मचाऱ्यांसह शहरात 1700 संक्रमित

आंध्रप्रदेशातील तिरुपती शहरात 5 ऑगस्टपर्यंत टोटल लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे. परंतू, यादरम्यान तिरुपती बालाजीसह इतर सर्व मंदिर सुरू राहणार आहेत. शहरातील लॉकडाउनमुळे तरुपती ट्रस्टने आफल्या ऑफलाइन सर्वदर्शन तिकीट व्यवस्थेला सध्या बंद केले आहे. आता मंदिरात दर्शनासाठी फक्त ऑनलाइन टाइम स्लॉट उपलब्ध असेल.

वाढत्या कोरोना रुग्णांमुळे संपूर्ण तिरुपती शहरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. तिरुपतीमधील सर्व 56 वार्डात 20 ते 30 कोरोना रुग्ण आहेत. यामुळे प्रशासनाने शहरांच्या सीमा बाहेरील वाहनांसाठी बंद केल्या असून, 5 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन असेल. यादरम्यान फक्त अत्यावश्यक सेवा सुरू असतील. यादरम्यान मंदिराच्या वाहनांना ये-जा करण्याची परवानगी असेल.

मंदिरातील कर्मचारी संक्रमित

तिरुपती मंदिरातील 170 कर्मचारी संक्रमित झाले आहेत. सोमवारी माजी मुख्य पुजारी श्रीनिवास दीक्षितुलु यांच्या कोरोनामुळे मृत्यूनंतर मंदिर ट्रस्टवर मंदिर बंद करण्याचा दबाव आहे. कर्मचारी संघटना मंदिर बंद करण्याची मागणी करत आहेत. परंतू, अद्याप ट्रस्टने मंदिर बंद ठेवण्याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. फक्त 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या कर्मचारी आणि पुजाऱ्यांना मंदिरात येण्यास बंदी घातली आहे.