आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यावर झाला बाळाचा जन्म VIDEO:तिरुपती हॉस्पिटलच्या आवारातील घटना; महिलांनी 'तिच्या' वर चादर टाकून केली प्रसुती

तिरुपती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे एका गर्भवती महिलेने रुग्णालयाबाहेरच बाळाला जन्म दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्यासोबत कोणीही नसल्याने रुग्णालय प्रशासनाने तिला उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

व्हिडिओत एक व्यक्ती डिलिव्हरी करताना दिसते
व्हिडिओमध्ये रस्त्यावरील काही महिला त्या गर्भवती महिलेवर चादर पांघरताना दिसून येत आहेत. त्यामध्ये एक पुरूष देखील मदत करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओत सांगितले गेले आहे की, प्रसूतीसाठी त्या पुरुषानेच मदत केली होती. हा व्यक्ती प्राथमिक उपचार केंद्रात काम करतो. ही महिला छत्तीसगडमधील बिलासपूर येथील रहिवासी आहे. धक्कादायक घटना म्हणजे, ज्या महिलेची प्रसुती ज्या हॉस्पिटलच्या बाहेर झाली. ते रुग्णालय शंभर खाटांचे प्रसुती रुग्णालय असल्याचे सांगितले जात आहे.

एका स्त्री आणि पुरुषाने त्या गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू होताच मदत केली.
एका स्त्री आणि पुरुषाने त्या गर्भवती महिलेला प्रसुती कळा सुरू होताच मदत केली.

नेमके हे प्रकरण काय आहे, असे का घडले

माध्यमामधून सांगितले जात आहे की, तिरुपती मॅटर्निटी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी महिलेला उपचारासाठी दाखल करण्यास नकार दिला. तिच्यासोबत कोणीही नसल्याने तिला दाखल करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयातून बाहेर येताच महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यामुळे अनोळखी व्यक्तींनी तिला मदत केली. ज्या व्यक्तीने तिला बाळंतपणात मदत केली. तो प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आहे.

त्यानंतर बाळ-बाळंतणीला दाखल करण्यात आले

गर्भवती महिलेला वेदना सुरू होत असल्याचे दिसल्यानंतर तिच्या मदतीसाठी लोक धावत सुटले. तिची रस्त्यावरच प्रसुती झाली. अखेर सदर महिलेला व तिच्या बाळाला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे प्रशासनाकड़ून सांगण्यात आले. महिलेला दाखल न करण्याबाबत रुग्णालयाने स्पष्टीकरण दिले आहे. तिरुपती जिल्हा आरोग्य प्रभारी श्रीहरी म्हणाले की, यापुढे गर्भवती महिलेसोबत कोणीही परिचर नसला तरी देखील तिला उपचार दिले जातील.

बातम्या आणखी आहेत...