आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हाथरस गँगरेप प्रकरणात गदारोळ सुरूच:राहुल गांधींनंतर यूपी पोलिसांनी तृणमूल खासदार डेरेक ओ'ब्रायन यांनाही धक्का देत पाडले, पार्टीच्या महिला नेत्या म्हणाल्या - 'आमचे ब्लाउज ओढण्यात आले'

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हाथरस गँगरेप पीडित कुटुंबाला भेटायला जात असलेल्या राहुल-प्रियंकांना पोलिसांनी गुरुवाररी अटक केली होती
  • धक्काबुक्कीमध्ये पडल्यानंतर राहुल गांधींच्या हाताला दुखापत झाली होती, पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवरही केला लाठीचार्ज

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात गदारोळ आणि राजकारण सुरूच आहे. राहुल-प्रियंका नंतर तृणमूल (टीएमसी) नेत्यांनी आज सामूहिक बलात्कार पीडित मुलीच्या गावी पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना गावाबाहेरच अडवले. टीएमसीचे खासदार डेरेक ओ'ब्रायन यांना धक्के देत जमिनीवर पाडण्यात आले.

तृणमूलच्या नेत्या ममता ठाकूर म्हणाल्या की, महिला पोलिसांनी आमचे ब्लाउज ओढले आणि आमच्या खासदार प्रतिमा मंडल यांच्यावरर लाठीचार्ज करत त्यांना खाली पाडले. फीमेल पोलिस असतानाही मेल पोलिसांनी आमच्या खासदाराला स्पर्श केला. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

पीडित कुटुंबाने केली सीबीआय तपासाची मागणी

एका व्हिडिओमध्ये हाथरसचे डीएम प्रवीण लक्षकार पीडित कुटुंबाला हे म्हणताना दिसत आहे की, मीडिया आज येथे आहे. उद्या राहणार नाही. तुम्ही सरकारचे ऐका. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला बाहेर जाऊ दिले जात नाहीये. मृत मुलीच्या वडिलांनी सीबीआय तपासाची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, यूपी पोलिसांवर आता विश्वास राहिलेला नाही. आम्हाला ते मीडियाला भेटू देत नाहीये. घरातून बाहेर निघाल्यावरही 10 प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत.