आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TMC In Bengal, BJP Returns In Assam; Left's Fort Will Be Saved In Kerala, Congress Alliance In Tamil Nadu And NDA Government In Puducherry Times Now C Voter Opinion Poll

टाइम्स नाऊ-सी व्होटर ओपिनिअन पोल:एवढी मेहनत घेऊन सुद्धा पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार नाही, केरळमध्ये तर केवळ एका जागेवर मानावे लागेल समाधान

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तृणमूलला 57 जागांचे नुकसान, भाजपला 104 जागांवर फायदा

पश्चिम बंगाल आणि केरळसह एकूण 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी टाइम्स नाउने सी व्होटर ओपिनिअन पोल जाहीर केले आहेत. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये भाजप नव्हे तर पुन्हा ममता बॅनर्जी यांचीच सत्ता येणार आहे. भाजपला फायदा केवळ एवढाच की या ठिकाणी त्यांच्या जागा वाढू शकतात. आसाममध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल. मात्र, काही जागा कमी होण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूत द्रमुक आणि काँग्रेस आघाडीची सत्ता येणार आहे. तर अण्णा द्रमुक आणि भाजप युतीला फटका बसू शकतो. केरळमध्ये सत्ता परिवर्तन होणार नाही. या ठिकाणी LDF सरकार कायम ठेवणार आहे. तर पुद्दुचेरीत मात्र काँग्रेस द्रमुक आघाडीला दणका देत भाजप सत्ता स्थापित करणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तृणमूलला 57 जागांचे नुकसान, भाजपला 104 जागांवर फायदा
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 294 पैकी 154 जागा मिळू शकतात. तर भाजपला 107 मिळतील असा अंदाज आहे. 2016 मध्ये तृणमूलला 211 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला फक्त 3 जागांवर विजय मिळवता आला होता. तृणमूलची सत्ता आली तरी यावेळी मात्र त्यांच्या 57 जागा कमी होणार आहेत. तर भाजपला 104 जागांचा फायदा होणार आहे. यासोबत काँग्रेस आणि डाव्या आघाडीला केवळ 33 जागा मिळतील अशी शक्यता आहे.

आसामात भाजप परतणार
सर्व्हेनुसार, आसाममध्ये पुन्हा भाजपची सत्ता येईल. NDA अर्थात संयुक्त राष्ट्रीय लोकशाही आघाडीला 126 पैकी 67 जागा मिळतील. तर काँग्रेसच्या नेतृत्वातील UPA अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीला 57 जागा मिळू शकतात. दोन जागा इतर पक्षांच्या खात्यात जातील. 2016 च्या निवडणुकीत भाजपला 74 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आघाडीने 39 जागा काबीज केल्या होत्या.

केरळमध्ये पुन्हा डावी आघाडी
सर्व्हेनुसार, केरळमध्ये लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट (LDF) पुन्हा सत्तेत येणार आहे. 140 पैकी 82 जागा डाव्यांना मिळतील. तर युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (UDF) ला 56 जागा मिळतील. भाजपला या ठिकाणी केवळ एकच जागा मिळेल असा अंदाज आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वातील यूडीएफने 20 जागांपैकी 19 जागा जिंकल्या होत्या. तसेच 47.48% मते मिळवली होती.

तामिळनाडूत द्रमुक काँग्रेस आघाडीची सत्ता
सर्व्हेनुसार, तामिळनाडूत सत्ता परिवर्तन होणार असून या ठिकाणी AIADMK अर्थात अन्नद्रमुक आणि भाजप युतीला केवळ 65 जागा मिळतील. तर द्रमुकच्या नेतृत्वातील यूपीए आघाडीला एकूण 234 पैकी 158 जागा मिळणार आहेत. 2016 मध्ये AIADMK-भाजप युतीला 136 जागा मिळाल्या होत्या.

पुद्दुचेरीत काँग्रेसला नुकसान
पुद्दुचेरीत NDA सरकार स्थापित करणार आहे. सर्व्हेनुसार, 30 विधानसभा जागांपैकी त्यांना 16 ते 20 जागा मिळतील. तर यूपीएच्या पदरात केवळ 12 जागा पडतील.

बातम्या आणखी आहेत...