आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तृणमूल नेत्याची जीभ घसरली:निर्मला सीतारमण यांची काळ्या नागिणीशी तुलना, कल्याण बॅनर्जी म्हणाले - काळी नागिण चावल्याने जसे लोक मरतात, तसंच यांच्यामुळे मरत आहेत 

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तृणमूल नेत्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तत्काळ राजीनामा देण्याची मागणी केली आहे
  • तृणमूल नेत्याने तत्काळ माफी मागावी, भाजपचा विरोध

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्र्यांविषयी वादग्रस्त विधान केले. बॅनर्जी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची तुलना विषारी सापाशी केली. ते म्हणाले की, जसे काळी नागिण चावल्यामुळे माणसे मरतात, त्याचप्रमाणे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यामुळेही लोक मरत आहेत. 

अर्थमंत्र्यांमुळे देश आर्थिक बाबतीत कमकुवत आहे

पश्चिम बंगालचे नेते म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. ते म्हणाले की, अर्थमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे आणि त्यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. निर्मला सीतारमण आतापर्यंतच्या सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत.

भाजपने दर्शविला विरोध

तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्याच्या विधानावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, कल्याण बॅनर्जी यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी. ते म्हणाले की, काली मातेची उपासना करणाऱ्या राज्यातील नेत्याकडून असे विधान अपेक्षित नाही. पात्रा म्हणाले की हे विधान केवळ वर्णद्वेषाचे नाही तर ते महिलांचा किती द्वेष करतात हे देखील दर्शवते.

बातम्या आणखी आहेत...