आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • TMC Leader Wrote On A White Shirt, Mocking The BJP Leader, Latest News And Update

मी मर्द आहे, सीबीआय, ईडीला मी मुळीच घाबरत नाही:TMC नेत्याने अंगावरील शर्टवर लिहिले; नाव न घेता भाजप नेत्याची उडवली खिल्ली ​​​​​​​

कोलकाता14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीएमसी नेते इद्रिस अली यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी पांढऱ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला असून त्यावर त्यांनी 'मी माणूस आहे, त्यामुळे सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सी मला हातही लावू शकत नाहीत' असे लिहले आहे. दरम्यान इद्रिस अली यांनी भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांचे नाव न घेता थेट त्यांच्यावर निशाणा साधला आहे. शुभेंदू यांची खिल्ली उडविली आहे.

सीबीआय आणि ईडीसारख्या एजन्सी आपल्याला हातही लावू शकत नाहीत, असा म्हणणारा एक नेता राज्यात आहे, असे सांगून TMC नेते इद्रिस अली यांना एका भाजप नेत्याची खिल्ली उडवायची होती. नबन्ना चलो रॅलीदरम्यान शुभेंदू यांनी एका महिला पोलिसावर मारहाणीचा आरोप केला होता. याचे व्हिडिओही समोर आले आहेत. महिला पोलिस कर्मचाऱ्याने त्यांना ताब्यात केले असता शुभेंदू यांनी संताप व्यक्त केला होता. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

56 इंच छाती असलेल्या भाजपच्या मॉडलचा भंडाफोड - TMC
टीएमसीने या मुद्द्यावरून शुभेंदू अधिकारी यांना घेरले. टीएमसीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले की, भाजपच्या 56 इंच छातीच्या मॉडेलचा आज भंडाफोड झाला आहे. यानंतर पक्षाचे खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये शुभेंदू म्हणत होते की, प्रत्येक महिलेच्या डोळ्यात मला मॉ दुर्गा दिसत आहे.

भ्रष्टाचाराविरोधात भाजपचा मोर्चा
भ्रष्टाचार आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी सरकारविरोधात भाजपने राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली होती. याला सचिवालय चलो मार्च (नबन्ना चलो मार्च) असे नाव देण्यात आले आहे. यासाठी दोन दिवस आधीच पश्चिम बंगालमधील विविध जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते आणि नेते रेल्वे आणि बसने कोलकत्ता येथे पोहचले होते. पोलिसांनी या निदर्शना विरोध केला. वेगवेगळ्या जिल्ह्यातून भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. एवढेच नाही तर रेल्वे आणि बसने येणाऱ्या कामगारांना पोलिसांनी रेल्वे स्थानक आणि बस टर्मिनलवरच ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईला विरोधही झाला.

बातम्या आणखी आहेत...