आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पश्चिम बंगालमध्ये येत्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तत्पुर्वी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. शुक्रवारी (22 जानेवारी) राज्याचे वन मंत्री राजीब बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याआधी 5 जानेवारीला राज्याचे क्रिडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनीदेखी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.
ममता बॅनर्जी यांना लिहीलेल्या पत्रात राजीब यांनी सांगितले की, ते कॅबिनेटमधून राजीनामा देत आहेत. पुढे ते म्हणाले की, पश्चिम बंगालमधील नागरिकांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मी यासाठी खूप आभारी आहे.' राजीब बॅनर्जी दोमजुरचे आमदार आहेत. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल जगदीप धनखड यांना पाठवला आहे.
यापूर्वी कुणी कॅबिनेट सोडली ?
या आधी 5 जानेवारीला पश्चिम बंगालचे क्रिडा मंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. पण, आमदारपद सोडले नाही. त्यावेळेस ममता म्हणाल्या होत्या, कुणीही राजीनामा देऊ शकतो, याला निगेटीव्हली घेऊ नये.
मागच्या महिन्यात शुभेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला
मागच्या महिन्यात 19 डिसेंबरला तृणमूलमधून राजीनामा देऊन ममता बॅनर्जी यांचे जवळचे शुभेंदु अधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यासोबत खासदार सुनील मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की आणि 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यातील 5 आमदार तृणमूलचे होते.
हे आमदार भाजपमध्ये सामील झाले
यापूर्वी तापसी मंडल, अशोक डिंडा, सुदीप मुखर्जी, सैकत पांजा, शीलभद्र दत्ता, दिपाली बिस्वास, शुक्र मुंडा, श्यांपदा मुखर्जी, बिस्वजीत कुंडू आणि बनश्री मैती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.