आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • TMC Party MLA Dipak Haldar Joins BJP Ahead West Bengal Vidhan Sabha Election 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पश्चिम बंगालमध्ये राजकीय उलथापालथ:तृणमूलचे दीपक हालदार यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला; 46 दिवसांत भाजपात जाणारे TMC चे 11 वे आमदार

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांनीही मंत्रिपदाचा दिला राजीनामा, मात्र भाजपात गेले नाही

विधानसभा निवडणुकीपूर्वीच ममता सरकारमधील आणखी एक आमदाराने मंगळवारी ( 2 फेब्रुवारी) भाजपात प्रवेश केला. डायमंड हार्बरचे आमदार दीपक हालदार यांनी सोमवारीच TMC चा राजीनामा दिला होता. भाजप नेता मुकुल रॉय आणि शुभेंदु अधिकारी यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. मागील 46 दिवसांत तृणमूच्या 11 नेत्यांनी भाजपचा हात धरला आहे. यावरून बंगालमध्ये कशाप्रकारे राजकीय उलथापालथ होत आहे याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

शुभेंदुंपासून झाली सुरुवात

TMC सोडून भाजपात प्रवेश करण्याचा सिलसिला 19 डिसेंबरपासून तीव्र झाला. तेव्हा शुभेंदु यांच्यासोबत खासदार सुनिल मंडल, माजी खासदार दशरथ तिर्की आणि 10 आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता. यामधील 5 आमदार तृणमूल पक्षाचे होते. यानंतर 21 जानेवारी रोजी शांतिपुरचे आमदार अरिंदम भट्‌टाचार्य आणि 30 जानेवारी रोजी माजी मंत्री राजीब बॅनर्जी, आमदार वैशाली डालमिया आणि प्रवीण घोषाल यांनी भाजपात प्रवेश केला होता.

लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्रिपदाचा दिला राजीनामा

ममता सरकारचे क्रीडा मंत्री आणि माजी क्रिकेटपटू लक्ष्मी रतन शुक्ला यांनी देखील मागील महिन्यात मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केला नाही. ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा आहे.

30 मे रोजी संपणार आहे सरकारचा कार्यकाळ

राज्यातील ममता बॅनर्जी सरकारचा कार्यकाळ 30 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे एप्रिल-मेमध्येच 294 विधानसभा जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...