आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालमध्ये भाजप VS तृणमूल:'बंगालमध्ये फक्त 30 जागा जिंकून दाखवा'; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाजपला ओपन चॅलेंज

कोलकाता4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपने हिंसाचार आणि फूट पाडणारे राजकारण थांबवावे: ममता

पुढच्या वर्षी होणाऱ्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. ज्या बोलपूरमध्ये काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रोड शो घेऊन 5 वर्षात 'सोनार बांग्ला' बनवण्याचा दावा केला होता, तर ममता बॅनर्जींनी आज पदयात्रा काढली.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी मंगळवारी काढलेल्या पदयात्रेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की, काही आमदारांनी पक्ष सोडल्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही. भाजप काही आमदारांना खरेदी करू शकते, पण तृणमूलला नाही. जनता आमच्यासोबत आहे. यावेळी ममतांनी भाजपला खुले आव्हान दिले की, 294 जागा जिंकण्याचे स्वप्न सोडा, भाजपने बंगालमध्ये फक्त 30 जागा जिंकून दाखवाव्या.

भाजपने हिंसाचार आणि फूट पाडणारे राजकारण थांबवावे: ममता

बिरभूमच्या बोलपूरमध्ये ममता यांनी बंगालची संस्कृती नष्ट करण्याचे षड्यंत्र रचला जात असल्याचे सांगत भाजपवर हल्ला चढवला. भाजपने हिंसाचार आणि फूट पाडणारे राजकारण थांबवावे, असेही त्या म्हणाल्या. तसेच, जे लोक महात्मा गांधी आणि देशातील महान व्यक्तींचा आदर करू शकत नाहीत, ते 'सोनार बांग्ला' बनवण्याच्या गोष्टी करतात, असेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...