आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला जैन मंदिराच्या खांबाला बांधून मारहाण, VIDEO:मुलाचा टाहो...काका मला वाचवा; पुजाऱ्याने चोरीचा आरोप करत केली मारहाण

भोपाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशाच्या सागर येथील एका जैन मंदिरात एका मुलाला मारहाण करण्यात आल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. मंदिराच्या पुजाऱ्याने या अल्पवयीन मुलाला प्रथम मारहाण केली. त्यानंतर त्याला मंदिरातीलच एका खांबाला बांधले. यावेळी मुलाने काका मला वाचवा म्हणून एकच टाहो फोडला होता. या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात पुजारी मुलाला दोरीने बांधताना दिसून येत आहे.

सागरच्या मोतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील करीला जैन मंदिरात ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ उजेडात आल्यानंतर पीडित कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर शुक्रवारी रात्री आरोपी पुजारी राकेश जैन याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुजाऱ्याने मुलावर पुजेच्या थाळीतील बदाम चोरी केल्याचा आरोप केला आहे.

मुलगा रडत होता, पण पुजाऱ्याने सोडले नाही

VIDEO मध्ये पुजारी व अन्य एक तरुण मुलाला पकडताना दिसून येत आहे. तो रडत म्हणतो, काका मला वाचवा, अंकल मला वाचवा. त्यानंतरही राकेश त्याला जबरदस्तीने खांबाला बांधतो. मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण राकेशने त्यांना पळवून लावले.

या प्रकरणी राकेश जैन म्हणाला - 2 मुले मंदिरात चोरीच्या हेतूने आले होते. त्यातील एक पळून गेला. दुसऱ्याला मी पकडले. तो पळून जाऊ नये म्हणून त्याला दोरीने बांधले. त्याने मंदिरातील पुजेच्या थाळीतील बदाम चोरून आपल्या खिशात ठेवले होते.

मुलाने सांगितले - पुजाऱ्याने पकडून नेले

मुलाने सांगितले - मी मित्रांसोबत मंदिराजवळ उभा होतो. पुजाऱ्याने पकडून आम्हाला आत नेले. त्यानंतर माझ्यावर चोरीचा आरोप करून मारहाण केली. एवढेच नाही तर त्याने मला दोरीने बांधूनही टाकले. मी त्याला सोडण्याची विनंती केली. पण त्याने काहीच ऐकले नाही.

शिवीगाळ व मारहाणीचा आरोप

मोतीनगर ठाण्याचे प्रभारी सतीश सिंह यांनी सांगितले की, छोटा करीला येथील 11 वर्षीय मुलगा आपल्या मित्रासोबत जैन मंदिराजवळ गेला होता. तो मंदिराच्या प्रवेशद्वारावर उभा होता. यावेली मंदिराचा पुजारी राकेश जैन यांनी येऊन त्याला मारहाण केली. त्याने मुलाला परिसरातील एका खांबाला बांधले. पीडित कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार पुजारी राकेश याच्याविरोधात शिवीगाळ, मारहाण व एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...