आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • PM Narendra Modi Announces To Observe August 14 As Partition Horrors Remembrance Day

स्वातंत्र्यदिनापूर्वी फाळणीची आठवण:पंतप्रधानांची मोठी घोषणा; फाळणीची वेदना विसरणे शक्य नाही, दरवर्षी 14 ऑगस्टला साजरा केला जाईल 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 14 ऑगस्ट हा तो दिवस होता जेव्हा देशाची फाळणी झाली आणि याच 1947 दिवशी पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट हा 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे. मोदी यांनी शनिवारी ट्विट करुन म्हणाले की, देशाच्या विभाजनाची वेदना कधीही विसरता येणार नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे, आमच्या लाखो बहिणी आणि बांधवांना विस्थापित व्हावे लागले. त्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा दिवस आम्हाला केवळ भेदभाव, वैमनस्य आणि वाईट इच्छा यांचे विष काढून टाकण्यासाठी प्रेरणा देईल, सोबतच एकता, सामाजिक सौहार्द आणि मानवी संवेदनांनाही बळकट करेल. असेही पंतप्रधान मोदींनी दुसऱ्या ट्विटमध्ये लिहले आहे.

14 ऑगस्ट हा तो दिवस होता जेव्हा देशाची फाळणी झाली आणि याच 1947 दिवशी पाकिस्तानला स्वतंत्र राष्ट्र आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतला स्वतंत्र राष्ट्र घोषित करण्यात आले.

75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार

75 व्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान मोदी रविवारी राष्ट्राला संबोधित करतील. भारताचा ऑलिम्पिक दल 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. 75 वा स्वातंत्र्य दिन हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवर लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधानांच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण होईल.

दिल्लीसह अनेक शहरांमध्ये स्वातंत्र्यदिनाची तयारी

स्वातंत्र्यदिनाची तयारी राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये जोरात सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...