आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Today 3 More Rafale Fighter Jets Coming To India, Will Be Air To Air Re Fueling With The Help Of UAE

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ:आज आणखी 3 राफेल लढाऊ विमान भारतात येणार, UAE च्या मदतीने एअर-टु-एयर री-फ्यूलिंग होणार

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात आता राफेलची संख्या वाढून 14 होईल.

भारतीय हवाई दल(IAF)च्या सामर्थ्यात अजून वाढ होणार आहे. आज संध्याकाळी फ्रान्समधून तीन राफेल लढाऊ विमान भारतात येत आहेत. हे गुजरातमध्ये लँड होतील. फ्रान्समधून निघाल्यानंतर UAE च्या मदतीने यामध्ये एअर-टु-एयर री-फ्यूलिंगही होईल.

भारतात आता राफेलची संख्या वाढून 14 होईल. आतापर्यंत 11 राफेल फ्रन्समधून आले आहेत. न्यूज एजेंसीने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात अजून 7 राफेल येऊ शकतात. या व्यतिरिक्त राफेलचे ट्रेनर व्हर्जनही भारतात येईल.

तिन्ही राफेल अंबालात तैनात असतील
तिन्हीही नवीन राफेल अंबाला येथे तैनात होतील. येथे तैनात केल्याने पश्चिम सिमेवर पाकिस्तानविरोधात जलद अॅक्शन घेतली जाऊ शकेल. महत्त्वाचे म्हणजे अंबाला एअरबेस चीनच्या सीमेपासूनही 200 किमीच्या अंतरावर आहे. अंबालामध्ये 17 व्या स्क्वाड्रन गोल्डन एरोज राफेलची पहिली स्क्वाड्रन असेल.

राफेलमध्ये परमाणू हल्ला करण्याची क्षमता

राफेल डीएच (टू-सीटर) आणि राफेल ईएच (सिंगल सीटर), दोन्ही विमान ट्विन इंजिन, डेल्टा-विंग, सेमी स्टील्थ कॅपेबिलिटीजसोबतच चौथ्या जनरेशनचे फायटर आहेत. या जेटमध्ये परमाणून हल्ला करण्याची क्षमता आहे. या फायटर जेटला रडार क्रॉस-सेक्शन आणि इन्फ्रा-रेड सिग्नेचरसोबत डिझाइन केले आहे. यात शक्तीशाली एम 88 इंजिन लावले आहे. राफेलमध्ये एक अॅडवांस्ड एवियोनिक्स सूटदेखील आहे. यात लावलेला रडार, इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम आणि सेल्फ प्रोटेक्शन इक्विपमेंटचा खर्च एकूण विमानाच्या 30% आहे.

बातम्या आणखी आहेत...