आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Today, Group Captain Harkirat Will Make The Landing Of The First Rafale In Ambala,

राफेलचा गृहप्रवेश:अंबाला एअरबेसवर उतरले पाच राफेल विमान, यादरम्यान वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला; संरक्षण मंत्री म्हणाले- सैन्य इतिहासात नवीन युगाची सुरुवात

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

फ्रान्सपासून 7 हजार किलोमीटर अंतर पार केल्यावर 5 राफेल बुधवारी दुपारी 3.15 वाजता अंबाला एअरबेसवर उतरले. पाचही राफेल एकाच एअरस्ट्रिपवर एकानंतर एक उतरले. यानंतर त्यांना वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला.

17 वा गोल्डन अ‍ॅरो स्क्वॉड्रॉन हा राफेलचा पहिला स्क्वाड्रन असेल. 22 वर्षानंतर भारताकडे 5 नवीन लढाऊ विमाने आली आहेत. यापूर्वी 1997 मध्ये रशियाकडून भारताला सुखोई मिळाले होते. एअर चीफ मार्शल आरकेएस भदोरिया यांच्यासह वेस्टर्न एअर कमांडचे अधिकारीही राफेल घेण्यासाठी अंबाला हवाई दल स्थानकात हजर आहेत.

यापूर्वी एयएनएस कोलकाताने राफेलच्या तुकडीशी संपर्क साधला. म्हटले - 'एरो लीटर, हिंद महासागरात आपले स्वागत आहे. हॅप्पी लँडिंग, हॅप्पी हंटिंग' असं म्हणत त्यांनी या विमानांच स्वागत केलं आहे.

अण्वस्त्रे बाळगण्याचे सामर्थ्य असणारे हे विमान जगातील एकमेव लढाऊ विमान आहे, ज्यामध्ये 55 हजार फूट उंचीवरुन शत्रूचा नाश करण्याची शक्ती आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही क्षमता भारताच्या दोन्ही शेजारी पाकिस्तान आणि चीनच्या सैन्यात नाही.

राफेलची वैशिष्ट्ये :-

 • 3 कोटी रुपयांपर्यंतचा लेजर बॉम्ब- मिका एअर-टू-एअर मिसाइल : 50 किमीच्या रेंजसह लक्ष्यानुसार आपला मार्ग निश्चित करू शकते.मीटियोर मिसाइलः जगातील अद्वितीय क्षेपणास्त्र. रेंज 100 किलोमीटर. ते अनेक लक्ष्यांवर मारा करू शकते. क्षेपणास्त्रांनी सज्ज असल्याने राफेलला शत्रू देशाच्या सीमेत घुसून हल्ला करण्याची गरज भासणार नाही.
 • लेजर किंवा जीपीएस गायडेड बॉम्ब : एका बॉम्बची किंमत 50 हजार ते साडेतीन लाख युरो म्हणजे ४४ लाख ते ३ कोटी रुपयांपर्यंत असू शकते. आयएसआयएसवर हल्ल्यात बहुतांशी त्याचाच वापर झाला. राफेलमध्ये या प्रकारचे ६ बॉम्ब लागू शकतात. त्याचे बॉम्ब पॉड्स 10 किमीपर्यंत लक्ष्यावर निशाणा साधू शकते.
 • अंडर कॅरिजमध्ये एक रिव्हॉल्व्हर कॅनन : हे 30 मिमी गोळीचा 1055 मीटर प्रति सेकंदच्या वेगाने मारा करते. हे रिव्हॉल्व्हर कॅनन दर मिनिटाला 2500 गोळ्या मारू शकते.
 • फायर अँड फॉर्गेट क्रूझ मिसाइल : पायलटने बटण दाबल्यानंतर ते आपोआप लक्ष्याच्या दिशेने जाते.
 • शत्रूच्या क्षेपणास्त्राचा रस्ता चुकवतो : राफेलमधील स्पेक्ट्रा इंटिग्रेटेड डिफेन्स यंत्रणा शत्रूचे रडार जाम करू शकते आणि त्याच्याकडे येणाऱ्या क्षेपणास्त्राबाबत सावध करतो. तो विमानाच्या प्रोटेक्टिव्ह शील्डचे काम करतो. तो छद्म सिग्नल पाठवू शकतो आणि रडार सिग्नल जाम करू शकतो, शत्रूचे सिग्नल निष्क्रीय करू शकतो. तरीही शत्रूने क्षेपणास्त्राने हल्ला केला तर स्पेक्ट्रा डिकॉय सिग्नल सोडून त्या क्षेपणास्त्राचा मार्ग चुकवतो.
 • फ्लाइट रेंज आणि इंधन क्षमता : फ्लाइंट रेंज साडेदहा तासांपेक्षा जास्त आहे. म्हणजे सतत 10 तासांपेक्षा जास्त उडू शकते. या दरम्यान 6 वेळा त्यात इंधन भरण्याची गरज भासते. जे हवेतच भरता येते. यात साडेपाच टन इंधन साठा होऊ शकतो. पूर्ण वेगात ते 10 मिनिटात 5 टन इंधन खर्च करते.
 • राफेलचे 3 प्रकार छट्रेनर- दोन आसनी, राफेल सी- सिंगल सीटर, राफेल एम- नेव्हीच्या विमानवाहू जहाजासाठी. ते अण्वस्त्र हल्लाही करता येऊ शकतो. एक राफेल तयार करण्यात सुमारे 2 वर्षांचा कालावधी लागतो. यासाठी 7000 कर्मचारी सतत काम करतात.