आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Today Is The Birthday Of Modi, The First Prime Minister Of The Country Who Was Born In Independent India, Became The Chief Minister After 16 Years Of Joining The BJP And Became The Prime Minister After 29 Years.

आजचा इतिहास:स्वतंत्र भारतात जन्म घेणारे देशातील पहिले पंतप्रधान मोदींचा आज वाढदिवस, भाजपत आल्याच्या 16 वर्षांनंतर CM आणि 29 वर्षांनंतर PM बनले

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • वयाच्या 8 व्या वर्षी मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) सामील झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्टेशनवर चहा विकण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे प्रमुख बनण्यापर्यंतचा प्रवास केला आहे. मोदींचा जन्म आजच्याच दिवशी 1950 मध्ये गुजरातच्या वडनगरमध्ये झाला. त्यांचे वडील दामोदरदास मोदी रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे. नरेंद्र मोदी वडिलांना या कामात मदत करायचे.

वयाच्या 8 व्या वर्षी मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात (आरएसएस) सामील झाले. 1971 मध्ये संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ता झाल्यानंतर त्यांचे राजकीय शिक्षण सुरू झाले. 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना लपून वेळ काढावा लागला. 1985 मध्ये भाजपमध्ये संघटनेचे काम मिळाले.

गुजरातच्या भुज येथील भूकंपानंतर प्रशासकीय व्यवस्था ढासळल्या होत्या, तेव्हा 2001 मध्ये मोदींना मुख्यमंत्री बनवण्यात आले. गुजरात दंगलींविषयीच्या आरोपांमध्ये अडकले, परंतु गुजरातच्या विकास मॉडेलला बेस बनवून केंद्राच्या राजकारणात आले आणि 2014 मध्ये, पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून प्रथमच, बिगर काँग्रेस पक्ष म्हणजे भाजपने पूर्ण बहुमत असणारे सरकार स्थापन केले. 2019 मध्ये ते सलग दुसऱ्यांदा पूर्वीपेक्षा चांगले कामगिरी करून सत्तेत परतले.

अलीकडेच, टाइम मासिकाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2021 साठी जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत देखील स्थान दिले आहे. मासिकाने सांगितले की, भारताच्या राजकारणात सर्वाधिक प्रभाव असलेली व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. हे सलग दुसरे वर्ष आहे की टाइमने पंतप्रधान मोदींना आपल्या यादीत समाविष्ट केले आहे.

1948: हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले
भारताच्या स्वातंत्र्यानंतरही काही स्वतंत्र राजवटी होत्या, ज्या भारताचा भाग होण्यास तयार नव्हत्या. त्यामध्ये भोपाळ, हैदराबाद, जुनागढ हे मुख्य होते. हैदराबादचा निजाम, मीर उस्मान अली सुद्धा भारतात विलीन होण्यास तयार नव्हता. सरदार पटेल यांना रियासत भारतात विलीन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. जेव्हा हैदराबाद दिर्घ चर्चेनंतरही विलीनीकरणासाठी तयार नव्हते, तेव्हा ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले. पोलिस कारवाईच्या नावाखाली ही लष्करी कारवाई होती.

ही पोलिस कारवाई 13 सप्टेंबर 1948 रोजी सुरू झाली. हे ऑपरेशन 3 दिवस चालले आणि 17 सप्टेंबर रोजी निजामाने भारतामध्ये विलीनीकरणास मान्यता दिली. अशा प्रकारे हैदराबाद भारताचा एक भाग बनला.

1908: जगातील पहिला हवाई अपघात
1903 मध्ये राईट ब्रदर्सने जगाला पहिले विमान सादर केले. डिसेंबरमध्ये त्याच्या यशस्वी चाचणीसह, राइट ब्रदर्स जगभर प्रसिद्ध झाले. ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांचे विमान प्रात्यक्षिक करायचे आणि त्यात सुधारणाही करायचे.

1908 मध्ये, यूएस आर्मी सिग्नल कॉर्प्सने 2-सीटर ऑब्जर्वेशन एयरक्राफ्टसाठी टेंडर काढले. जे विमान लष्कराच्या गरजा पूर्ण करेल ते लष्कर त्याच्या कामात वापरेल असे सांगण्यात आले. राइट ब्रदर्सने देखील आपले विमान यूएस आर्मीसमोर सादर केले.

17 सप्टेंबर 1908 रोजी राईट ब्रदर्सने बनवलेल्या विमानाची व्हर्जिनियामध्ये चाचणी घेतली जात होती. ओर्विल राईट हे विमान उडवत होते आणि लेफ्टनंट थॉमस सेल्फ्रिज त्यांच्यासोबत बसले होते, पण हवेतच विमानात काही बिघाड झाला आणि विमान सुमारे 75 फूट उंचीवरून जमिनीवर कोसळले.

या अपघातात थॉमस गंभीर जखमी झाले आणि त्यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. रात्री ऑपरेशन दरम्यान थॉमस यांचा मृत्यू झाला. विमान अपघातात हा पहिला मृत्यू होता.

2011: 'वॉल स्ट्रीटवर कब्जा करा' आंदोलन
वॉल स्ट्रीट ताब्यात घेण्याची चळवळ 10 वर्षांपूर्वी याच दिवशी सुरू झाली होती. भांडवलशाहीविरोधातील ही चळवळ 2011 मध्ये न्यूयॉर्कमधील झुकोटी पार्कपासून सुरू झाली आणि हळूहळू युरोपच्या देशांमध्ये पसरली आणि जगातील 82 देशांमध्ये पोहोचली होती.

आंदोलक बहुतेक बेरोजगार होते, ज्यांच्या नोकऱ्या 2008 च्या जागतिक मंदीमुळे हिरावून घेण्यात आल्या होत्या. युरोपमधील काही देशांमध्ये कर्जाचे संकट गडद झाले होते.

17 सप्टेंबर रोजी इतिहासात घडलेल्या इतर काही महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना...

 • 2017: पीव्ही सिंधू कोरिया ओपन सुपर सीरिज जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू बनली.
 • 2009: केंद्रीय दक्षता आयोगाने 123 भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांची नावे वेबसाइटवर प्रसिद्ध केली.
 • 2004: युरोपियन संसदेने मालदीववर निर्बंध लादण्याचा ठराव मंजूर केला.
 • 2002: इराकने संयुक्त राष्ट्रांच्या शस्त्र निरीक्षकांना बिनशर्त देशात प्रवेश करण्यास परवानगी दिली.
 • 1999: ओसामा बिन लादेनने भारताविरुद्ध जिहाद जाहीर केला.
 • 1957: मलेशिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
 • 1956: भारतीय तेल आणि नैसर्गिक वायू आयोगाची स्थापना.
 • 1995: हाँगकाँगचे राज्य चीनकडे सोपवण्यापूर्वी ब्रिटिशांनी तेथे प्रथमच विधान परिषदेच्या निवडणुका घेतल्या.
 • 1986: भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन यांचा जन्म.
 • 1982: पहिला क्रिकेट कसोटी सामना भारत आणि सिलोन (श्रीलंका) यांच्यात खेळला गेला.
 • 1974: बांगलादेश, ग्रेनाडा आणि गिनी बिसाऊ संयुक्त राष्ट्रात सामील झाले.
 • 1949 : द्रविड मुनेत्र कळघम (DMK), दक्षिण भारतीय राजकीय पक्षाची स्थापना.
 • 1915: प्रसिद्ध आणि वादग्रस्त चित्रकार मकबूल फिदा हुसेन यांचा जन्म.
बातम्या आणखी आहेत...