आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 'Today Is The Black Day Of The Indian Court Date, Did The Mosque Disappear By Magic? Asaduddin Owaisi

बाबरी प्रकरण:'आज भारतीय न्यायालयाच्या तारखेचा काळा दिवस, जादूने मशीद गायब केली होती का? '-असदुद्दीन ओवैसी

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM) पक्षाचे चीफ असदुद्दीन औवैसी यांनी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना 'सीबीआय कोर्टाचा निर्णय म्हणजे, भारतीय न्यायालयाच्या तारखेचा काळा दिवस' म्हटले. तसेच, औवैसी यांनी न्यायालयाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्तित करत, 'जादूने मशीद गायब केली होती का? जादू करून मुर्ती ठेवल्या होत्या का? जादूने टाळे उघडण्यात आले?' असे प्रश्नही केले आहेत.

औवैसी यांनी सीबीआय कोर्टाच्या निर्णयाला अन्यायकारक असल्याचे सांगत, "मला एक भारतीय मुस्लिम म्हणून आज अपमानित, लाजिरवाणा आणि असहाय्य वाटत आहे.' त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) ला या निर्णयाला आव्हान देण्याची अपील केली आहे.

'मिठाई वाटली, मशीद तोडण्याच्या घोषणा देण्यात आल्या'

औवैसी पुढे म्हणाले की, 'लालकृष्ण आडवाणी यांनी संपर्ण देशात रथयात्रा काढली होती. तेव्हा प्रत्येक ठिकाणी हिंसाचार झाला. उमा भारतीं यांनी घोषणा दिली होती- 'एक धक्का और दो, बाबरी मस्जिद तोड़ दो.' जेव्हा बाबरी मशीद तोडण्यात आली, तेव्हा मिठाई वाटण्यात आल्या. आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार कट रचत होते आणि मशीद पाडल्याचा आनंद व्यक्त करत होते.'

'वही कातिल, वही मुंसिफ, अदालत उसी की'

खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी निर्णयावर एक शायरी ट्वीट करत नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरवर ट्वीट केले की, 'वही कातिल वही मुनसिफ अदालत उसकी वो शाहिद, बहुत से फैसलों में अब तरफदारी भी होती है.'