आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Today, Janmashtami Will Be Celebrated Like This In Three World Famous Krishna Temples, Mahapuja Will Be Celebrated Like This, But Krishna's Teachings, Go Ahead Facing Fear

घरातच कृष्ण अन् मन वृंदावन !:तीन जगप्रसिद्ध कृष्ण मंदिरांत आज अशी साजरी होईल जन्माष्टमी अन् अशी होईल महापूजा, तर कृष्णाची शिकवण, भयाचा सामना करत पुढे जा...

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक

कृष्ण म्हणजे आनंदाची धारा.. मन अस्वस्थ असेल, चिंताक्रांत असेल अशा गंभीर वातावरणात कृष्णाचा जन्म होतो. हाच जन्माष्टमीचा खरा संदेशही आहे. गांभीर्यात आनंदाला साद घाला... आज कोरोनामुळे मंदिरे बंद आहेत. म्हणून घरातच कृष्ण जन्मोत्सव साजरा करा...हाच मर्यादा धर्म आहे...

कृष्णाची शिकवण, भयाचा सामना करत पुढे जा...

देवदत्त पटनायक, पौराणिक अभ्यासक
“कालिया नाग आणि बाळकृष्णात भीषण युद्ध झाले होते. कालिया रोज यमुना नदीचे पाणी विषारी करत होता. यामुळे कृष्णाने त्याला पिटाळून लावण्याचे ठरवले. कृष्ण कालियाच्या फण्यावर झेपावत त्याला लाथ मारू लागला आणि येथून जाण्यास सांगितले. कालियाने नकार दिला. तो म्हणाला, ‘पुढे गरुड राहतो, तो मला मारील.’ यावर कृष्ण म्हणाला, आयुष्यात नेहमी पुढे जाणे आवश्यक आहे. भीऊ नको. धीर धर, पुढे जा. गरुडाशी सामना करण्यासाठी तू कोणती ना कोणती युक्ती शोधशीलच.’ आपण अज्ञात गोष्टींचा सामना करण्याला घाबरतो. कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास कचरतो. कालियाची कथा आपणास आपल्या भीतीला सामोरे जाण्याची शिकवण देते.

कृष्ण रासलीलेतूनही महत्त्वाची शिकवण मिळते. गोपींना रात्री घरापासून दूर वनातही कृष्णाच्या संगतीत स्वत:ला सुरक्षित वाटत होते. वास्तवात, गोपी कृष्णावर अधिकार गाजवत तेव्हा कृष्ण गायब होत... वनात अंधार दाटला जाई. आपण सर्वच भ्यायलेल्या गोपींसारखे आहोत. बासरीच्या मधुर सुरासाठी थांबलेले. प्रत्येक मनुष्य एकाच वेळी गोपी व कृष्ण दोन्ही आहोत हे विसरतो. संगीतासाठी आतुर आणि संगीत वाजवण्यात सक्षम. यासाठी हे समजून घ्यावे की, आपणाकडे बासरी आहे व आसपासचे लोक संगीतासाठी आतुर आहेत.

कृष्णाची सर्वात मोठी शिकवण भगवद्गीतेमधून मिळते. त्यात धर्माच्या रक्षणार्थ कुरुक्षेत्रावर लढण्यासाठी अर्जुनाचे मन वळवले होते. धर्माचे पालन म्हणजे- बोलण्याऐवजी इतरांचे एेकणे, घेण्याऐवजी देणे, असहाय लोकांना मदत करणे, मैत्र करणे व इतरांवर वरचढ न होणे. धर्माच्या पालनात भुकेला मनुष्यही अन्न वाटतो. जमिनीच्या वाटणीस नकार दिल्यामुळे कौरवांचा मृत्यू झाला. जोवर आपली लालसा योग्य ठरवण्यासाठी आपण कारणे शोधत राहू तोपर्यंत युद्ध होईल. शांतता नांदणार नाही.

 • बांके बिहारी, मथुरा (उत्तर प्रदेश)

२१ प्रकारच्या मिष्टान्नांचा असतो नैवेद्य, येथे जन्माष्टमीलाच होते मंगल आरती
श्रीकृष्णाचा स्तुती मंत्र...
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः।।

 1. बुधवारी रात्री ११ वा. मंदिराचे सेवेकरी गोस्वामीगण मंदिर परिसरात २१ प्रकारचे नैवेद्य घेऊन प्रवेश करतील.
 2. ठाकुरजींना विनंती करतील की, त्यांनी नित्यराससाठी जाऊ नये, आज जयंतीसाठी त्यांचा अभिषेक व्हायचा आहे.
 3. मंदिराबाहेर दोन यज्ञाचार्य श्रीमद्भागवताच्या दशम स्कंदच्या पहिल्या ३ अध्यायांतील जन्मप्रसंगाचा पाठ करतील.
 4. गोस्वामीगण ठाकुरजींची अत्तराने मालिश करत त्यांना ११.४५ वा. उठवतील. बाहेर कुंजबिहारी अष्टकाचा पाठ सुरू होईल.
 5. मातीच्या भांड्यात चांदीचे पात्र ठेवून अभिमंत्रित केले जाईल. या पात्रावर बांके बिहारीला स्थापित केले जाईल.
 6. आधी शुद्ध जल, मग दूध, दही, तूप, मध व साखरेने स्नान होईल. मग तयार पंचामृत व शेवटी शुद्ध पाण्याने स्नान. त्यानंतर ठाकुरजींना सिंहासनावर विराजमान करून शृंगार व नैवेद्य होईल.
 7. यानंतर त्यांना गर्भगृहाबाहेर आणले जाईल. मंगल आरती होईल. फक्त जन्माष्टमीलाच ही आरती होते.

- गोपी गोस्वामी, मंदिराचे प्रमुख सेवेकरी

 • श्री द्वारकाधीश, द्वारका (गुजरात)

द्वारकाधीशांचा १६५० वेळा जलाभिषेक, रात्री २ पर्यंत उघडे राहतील मंदिराची द्वारे
या मंत्राने पूजेचा प्रारंभ होतो...

तं यज्ञं बर्हिषि प्रौक्षन् पुरुषं जातमग्रत:। तेन देवाSअयजन्त साध्याSऋषयश्च ये।।

 1. द्वारकाधीशचे श्याम पाषाण स्वरूपाची पूजा द्वारकेत होते. हे स्वरूप त्रिविक्रमराय म्हटले जाते, जे विष्णूच्या २४ अवतारांपैकी एक आहे.
 2. बुधवारी पूर्व रात्रीत १० वाजेची अारती होईल. मग १६५० अभिषेक केले जातात.
 3. त्यानंतर दूध, दही, तूप, मध, साखर आदींच्या पंचामृताने देवाचा अभिषेक होतो. मग दुधाने अभिषेक होत राहतो जो वेदोक्त, पुराणोक्त व पुरुषोक्त मंत्रांद्वारे केला जातो.
 4. मध्यरात्री आरतीसोबत गोपाळाला विविध मिष्टान्नांनी नैवेद्य चढवला जातो.
 5. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे नवमीला देवाला अतिप्रिय लोणी-साखरेचा नैवेद्य दिला जातो.
 6. जगत््मंदिराचे द्वार इतर दिवशी रात्री १० वाजताच बंद होतात. जन्मोत्सवाच्या रात्री मात्र देवाला बालरूपात पाळण्यात टाकले जाते. हा सोहळा वर्षातून एकदाच म्हणजे जन्माष्टमीच्या रात्री होतो. विशेष म्हणजे या सोहळ्याच्या वेळेत द्वारे रात्री दोन वाजेपर्यंत उघडी असतात.

-प्रणवभाई, पुजारी जगत मंदिर, श्रीनाथजी, नाथद्वारा (राजस्थान)द्वारका

 • श्रीनाथजी, नाथद्वारा (राजस्थान)

मंत्रोच्चारांऐवजी कृष्णजन्माची पदे आणि शुभेच्छांची गाणी गायिली जातात...
बाजत आज बधाई गोकुल में..., जसुमति कूंख चंद्रमा प्रगट्यो-या जग को उजियार।
पहाटे ४ वाजता शंखनाद होईल. सकाळी ८.३० वाजता श्रीनाथजींचे दूध, दही, तूप, साखर व मधाने पंचामृत स्नान होईल. शृंगारानंतर मोहरी-मिठाने दृष्ट काढली जाईल. पंड्याजी ठाकूरजींना जन्मकुंडलीबद्दल सांगतील.

 1. रात्री ९. १५ वाजता दर्शनास सुरुवात होईल. हवेलीमध्ये नौबती, नगारे, घंटासह शंखध्वनींचा नाद घुमेल.
 2. रात्री १२ वाजता ठाकूरजी प्रकट झाल्याचे संकेत देण्यासाठी नगारखान्यातून बिगुल वाजेल. रिसाला चौकात दोन तोफांनी २१ वेळा सलामी दिली जाईल.
 3. श्रीनाथजींना दूध, दही, तूप, मध व त्यानंतर साखरेने स्नान व पुन्हा जलाभिषेक होईल. चंदन आदी संुगंधी द्रव्याने स्नान, शंृगार होईल. नंतर जन्मारती होईल.
 4. चंदन आदी सुगंधित द्रव्यांनी स्नान झाल्यावर शृंगार केला जाईल. जन्मारती व नंतर कीर्तन होईल.
 5. रात्री १.१५ वाजता महाभोगात पंजिरी, ५ भात, धान्य-दूध, फळ आदीपासून तयार १०० हून अधिक व्यंजने अर्पण करण्यात येईल.

- तिलकायत राकेशजी महाराज

पांचजन्य शंखकृष्णाचा शंख हा संपूर्ण संयमाचे प्रतीक
कृष्णाला प्रिय असलेला पांचजन्य शंख, समुद्रमंथनातून निघालेले सहावे रत्न होते. काैरव-पांडवांत युद्धाची सुरुवात करताना दोन्ही बाजूंच्या सैन्याने आपल्या विजयाच्या कामनेसाठी शंखनाद केला होता. विशेष म्हणजे जो शंख श्रीकृष्णाने वापरला, तो अत्यंत दुर्मिळ पांचजन्य शंख होता. या शंखातून पाच मुखांनी ध्वनी निघत असत. यामुळे त्याला पांचजन्य असे म्हणत. पुराणांनुसार या पाच ध्वनींची द्वारे मनुष्याची पाच इंद्रिये व त्यांच्या अवयवाची ओळख करून देणारे आहेत. शंखनाद म्हणजे जर मनुष्य आपली इंद्रिये व या अवयवांवर संयम मिळवेल तर तो जीवनाच्या सर्व धर्मयुद्धात यशस्वी ठरेल, असे अावाहन करणारे आहे.

बातम्या आणखी आहेत...