आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Today, On The Occasion Of 'World Press Freedom Day', 3 New Activities Of Bhaskar Group

‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे’निमित्त भास्कर समूहाचे 3 नवे उपक्रम:रमेश अग्रवाल जर्नालिझम प्रोग्राम, जर्नालिझम अवॉर्ड आणि महिला पत्रकारांची भरती

औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज ‘वर्ल्ड प्रेस फ्रीडम डे’ निमित्त पत्रकारितेत आणखी उच्च स्थान प्राप्तीसाठी भास्कर समूह ३ नवे उपक्रम राबवत आहे.

1. दैनिक भास्कर समूह आपल्या पत्रकार सहकाऱ्यांसाठी पुढील वर्षापासून ‘रमेश अग्रवाल जर्नालिझम अवॉर्ड’ सुरू करत आहे. भास्करची सर्वात मोठी शक्ती म्हणजे वाचकांपर्यंत पूर्ण माहिती व विश्लेषण पोहोचवणारे आमचे पत्रकार. या सहकाऱ्यांना हा अवॉर्ड दर वर्षी दिला जाईल. या अंतर्गत ज्यूरी अशा स्टोरी निवडतील, ज्या प्रेसचे स्वातंत्र्य दर्शवणाऱ्या आहेत.

2. दैनिक भास्कर समूह पुढील वर्षभरात प्रिंट आणि डिजिटलमध्ये ५० महिला पत्रकारांची नियुक्ती करणार आहे. हे सांगताना आम्हाला हार्दिक आनंद वाटत आहे.

3. रमेश अग्रवाल जर्नालिझम फेलोशिप प्रोग्राम: भास्कर समूह पत्रकारितेत नवीन पिढीला चांगली संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे. समूहाने या वर्षापासूनच फेलोशिपला सुरुवात केली आहे. ही वार्षिक पत्रकारिता फेलोशिप ‘रमेश अग्रवाल जर्नालिझम फेलोशिप प्रोग्राम’ नावाने ओळखली जाईल.

बातम्या आणखी आहेत...