आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Today The Prime Minister Will Give The National Bal Shakti Puraskar Through Video Conferencing; Communicate With The Winners

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

32 जणांचा सन्मान:व्हिडियो कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी राष्ट्रीय बाल शक्ती पुरस्कार केले प्रदान, विजेत्या मुलांसोबत केली चर्चा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • DM ऑफिसमध्ये होणार व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग

आज म्हणजेच सोमवारी देशभरातील 32 मुलांना राष्ट्रीय बाल पुरस्कार 2021 ने सन्मानित केले. हा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून दिला. त्यांनी विजेत्यांसोबत संवादही सादला आणि त्यांचे अनुभवही ऐकले.

बाल पुरस्कार असाधारण क्षमता असणाऱ्यांना किंवा नाविन्य, शैक्षणिक, क्रीडा, कला, सांस्कृतिक, समाज सेवा, शौर्य यासह इतर क्षेत्रात विशेष ओळख प्राप्त झालेल्या मुलांना देण्यात येतो.

मुलांचे अनुभव ऐकले
पंतप्रधानांनी सर्वात पहिले मुंबईच्या काम्यासोबत बातचित केली. तिला गिर्यारोहण या क्षेत्रात हा पुरस्कार मिळाला आहे. मोदींनी काम्याला विचारले की, सध्या कोणत्या नवीन पर्वतावर विजय मिळवला आहे? काय नवीन आहे? कोरोनामुळे कोणत्या समस्या आल्या?

यावर काम्या म्हणाली की, कोरोनाने सर्वांना त्रास दिला आहे, पण आपल्याला थांबायचे नाही. मी जम्मू-कश्मीरमध्ये ट्रेनिंग केली. जूनमध्ये माउंट देनाली सर करण्याची तयारी करत होते. यावर मोदी म्हणाले की, तुम्ही ट्रेकिंग करता, संपूर्ण जग फिरून येता, मग कोरोनामुळे सर्व बंद झाले तर मग वेळ कसा घालवला. काम्याने म्हटले की, मी या संकटाचे रुपांतर संधीत केले. मी दुसऱ्यांना गिर्यारोहण विषयी सांगत आहे. माझ्या मिशनविषयी सांगत आहे.

यूपीमधील 5 मुलांची झाली निवड
उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 5 मुलांची निवड बाल पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. लखनऊचा 10 वर्षांचा बालक व्योम आहूजाला कला आणि संस्कृतीसाठी आणि बाराबंकीच्या 15 वर्षीय कुंवर दिव्यांश सिंह याला शौर्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करतील. गौतमबुद्धनगरच्या 16 वर्षांच्या चिराग भंसालीला इनोव्हेशनसाठी तर अलीगढ येथील 17 वर्षीय मोहम्मद शादाब याला शैक्षणिक क्षेत्रासाठी पुरस्कृत केले जाईल. तसेच प्रयागराजच्या 17 वर्षीय मोहम्मदला क्रीडा प्रकारात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

DM ऑफिसमध्ये होणार व्हिडिओ कॉन्फ्रेसिंग
PMO कडून जारी करण्यात आलेल्या सूचनेनुसार, सर्व विजेता मुलांना त्यांच्या जिल्ह्याच्या DM ऑफिसमधून व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून कनेक्ट केले. मुलांनी आपल्या कामाची माहितीही पंतप्रधानांसोबत शेअर केली.