आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर फंडा:नोकरदारांसाठी परीक्षेची तयारी करणे अवघड, नोकरीसह स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या 8 पॉवर टिप्स

संदीप मानुधने, शिक्षणतज्ज्ञ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अपना ज़माना आप बनाते हैं अहल-ए-दिल, हम वो नहीं कि जिन को ज़माना बना गया ~ जिगर मुरादाबादी

करिअर फंडात स्वागत!

खरा सुपरमॅन

जगातील खरा सुपरमॅन कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का?

हो खरे आहे. जे लोक जॉबसह शिक्षण करतात तेच सुपरमॅन आहेत. हे एक अत्यंत अवघड काम आहे. ते प्रत्येकाला जमत नाही.

तुम्हीही याच स्थितीत आहात काय? हो तर, आजचा करिअर फंडा तुमच्यासाठीच आहे!

दोन मोठ्या गोष्टी एकत्रच का?

जॉबसोबत काम का करावे लागते? 2 कारणे आहेत – (1) पहिले, आर्थिक व (2) दुसरे विद्यमान नोकरीवर समाधानी नसणे.

तुम्ही आपल्या विद्यमान नोकरीत समाधानी असाल तर तुम्ही स्पर्धा परिक्षांची तयारी करण्याचा विचारही करणार नाही. कारण, तुम्हाला तुमचे भविष्य सुरक्षित व आनंदी दिसले असते. पण तुम्ही तुमच्याच क्षेत्रात प्रमोशनसाठी पुढील शिक्षण घेऊ शकता. हा तुमच्या आवडीचा विषय असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासारखे फारसे जडही जाणार नाही.

चला तर मग पाहूया हे अवघड काम मॅनेज करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज आहे.

समतोल साधण्याच्या 8 पॉवर टिप्स

1) ताळमेळ (Coordination) – अभ्यास व नोकरीच्या क्षेत्रात समन्वय साधणे हा मूलमंत्र आहे.

A. अर्थात अशा क्षेत्रात काम करून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यास मदत होईल.
B. उदाहरणार्थ, तुम्ही SSCची तयारी करत असाल व सोबतच गणिताचा अभ्यास करत असाल, तर SSCच्या तयारीमध्ये गणिताचा अभ्यास उपयुक्त ठरेल, किंवा तुम्ही नागरी सेवांची तयारी करत असाल, तर तुम्ही विविध कोचिंग क्लासेसमध्ये तुम्ही संबंधित कंटेंट डेव्हलपमेंट, ब्लॉग रायटिंग, नोट्स तयार केल्याने तुम्हाला फायदा होईल. तसेच उत्पन्न देखील मिळेल.

2) स्पष्टपणा (Clarity) – भारतातील खाजगी नोकर्‍या ओव्हरटाइम काम करून घेण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.

A. अशा परिस्थितीत, जर ते काम तुमच्या दीर्घकालीन नियोजनाचा भाग नसेल, तर तुम्ही कामासाठी किती तास (4, 6 किंवा 8) देऊ शकता हे तुमच्या मालकाला स्पष्टपणे सांगणे चांगले.
B. हे स्पष्ट केल्याने, तुम्हाला कोणती जबाबदारी द्यायची हे ठरवणे नियोक्त्यासाठी सोपे होते.

3) वेळेचे नियोजन (Time Planning) – तुम्ही नोकरीसोबतच परीक्षेची तयारी करत असल्याने इतर उमेदवारांच्या तुलनेत तुमच्याकडे तयारीसाठी कमी वेळ आहे असे समजून वाटचाल करा. तुमच्यासाठी नियोजन खूप महत्त्वाचे आहे.

A. सर्वप्रथम, तुम्हाला जेवढा जास्त वेळ काढता येईल तेवढा काढा. म्हणजे लवकर तयारी सुरू करा. इतर उमेदवारांनी त्या परीक्षेच्या तयारीसाठी 8 महिने दिले तर तुम्ही 16 महिने किंवा 12 महिने आधीच तयारी करायला सुरुवात करावी.

B. अभ्यासक्रम व मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा नीट अभ्यास करून संपूर्ण अभ्यासक्रमाचे छोटे छोटे तुकडे करून साप्ताहिक वेळापत्रक तयार करा. डायरी ठेवा, कामाची यादी बनवा.

4) मर्यादांची जाणीव ठेवा (Know your limits) – कोणतेही काम आपल्या क्षमता ओळखूनच करा.

A. कम्फर्ट झोन तोडणे चांगली गोष्ट, पण दुस्साहस करू नका.
B. सांगण्याचा हेतू म्हणजे, मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होणार नाही एवढाच लोड घ्या.
C. स्वतःच्या मर्यादा समजून घ्या व त्यांचा आदर करा. तसेच आपण जास्त ताण घेत नाही याची खात्री करा. कारण, तुम्ही आजारी पडल्यास, नुकसान जास्त होईल.

5) वेळेचा हुशारीने वापर करा (Use time intelligently) – वेळेचा अपव्यय करणाऱ्या टीव्ही, फेसबुक, मित्रांशी गाव-गप्पा अशा गोष्टी टाळा.

A. तसेच वेळ वाचवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधा. उदा. वर्तमानपत्र 20-25 मिनिटे टॉयलेटमध्ये वाचता येते.
B. तुम्ही कामावर ये-जा करताना प्रवास करत असाल तर ही गोष्टींवर मनातल्या मनात विचार करण्याची योग्य वेळ असते.
C. वॉशिंग मशीन चालवताना ऑडिओ बुक ऐकणे आदी कोणती 2 कामे एकाच वेळी करता येतील याचा विचार करत राहा. वीकेंड व इतर सुट्ट्यांचा पुरेपूर फायदा घ्या.

6) वैकल्पिक पद्धतींवर काम करा (Find options) – पूर्णवेळ काम आवश्यक आहे का? व त्याऐवजी अर्धवेळ किंवा वीकेंडला काम केल्याने तुमच्या आर्थिक समस्या सुटतील का हे पाहा. तुम्हाला असा एखादा पर्याय सापडला तर त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळेल.

7) पुरेशी विश्रांती घ्या, आरोग्याला प्राधान्य द्या (Health is Wealth) – शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे अत्यंत महत्वाचे आहे! किमान 7 ते 8 तास झोपा! यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल व तुमची स्मरणशक्तीही सुधारेल. यामुळे तुम्हाला तणावाचा चांगल्या प्रकारे सामना करण्यास मदत होईल. तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी दिवसभर पौष्टिक अन्न घ्याल याची काळजी घ्या. 15-20 मिनिटे योगासने किंवा हलका व्यायाम करणे देखील उपयुक्त आहे.

8) तंत्रज्ञानाचा फायदा घ्या (Use technology to the fullest) – क्लास नोट्स आवश्यक आहेत. पण प्रत्येक शब्द लिहिणे टाळा. शब्द व वाक्ये संक्षिप्त करण्याचा तुमचा स्वतःचा मार्ग शोधा. व्हॉइस रेकॉर्डर विकत घ्या. तुम्ही वर्गाचा आवाज रेकॉर्ड करू शकता व नंतर त्याचा वापर करू शकता.

मला अपेक्षा आहे की, मी सुचवलेल्या या टिप्स तुम्हाला नोकरी व शिक्षणाचा समतोल साधण्यास मदत करतील.

..तर आजचा करिअरचा फंडा हा आहे की, तुम्ही दृढनिश्चय केला तर प्रोफेश्नल्ससाठी काहीही अवघड नाही. पण उत्साहात होश गमावू नका. समतोल साधून काम करा.

करून दाखवू या!

बातम्या आणखी आहेत...