आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरतमध्ये गोदादरा ते लिंबायत असा रोड शो पार पडला. ज्यामध्ये पंतप्रधानांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते. या सगळ्यांत ऋषी पुरोहित हा एक पाच वर्षीय चिमुरडा मोदींच्या वेशभूषेत आल्याने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या मुलाने विविध सरकारी योजनांची A टू Z माहिती सांगितली.
मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजही आबालवृद्धांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. याचे उत्तम उदाहरण आज सुरतमध्ये पंतप्रधानांच्या रोड शोमध्ये पाहायला मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सुरतच्या लिंबायतमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणीसाठी आले होते. दरम्यान, गोदादरा ते लिंबायत निलगिरी सभास्थळ असा अडीच किलोमीटरचा रोड शो पार पडला. ज्यामध्ये पंतप्रधानांना भेटण्यासाठी आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण मार्गावर मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. या सगळ्यांत पाच वर्षांचा ऋषी पुरोहितही मोदींचे स्वागत करण्यासाठी आला होता. तो मोदींच्या वेशभूषेत असल्याने आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला.
छोट्या मोदीने वेधले सर्वांचे लक्ष
पंतप्रधानांच्या हेलिपॅडजवळ बांधलेल्या राजस्थानी समाजाच्या पाच क्रमांकाच्या स्टेजवर ऋषी पुरोहित हा छोटे मोदी बनून आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृती आणि नेतृत्वामुळे प्रभावित झाल्याचे तो सांगतो. म्हणूनच खुद्द नरेंद्र मोदी आज सुरतमध्ये आले असताना त्यांना पाहण्यासाठी ऋषी पुरोहित छोटा नरेंद्र मोदी बनून सहभागी झाला. त्यामुळे रोड शोमध्ये उपस्थित सर्वांमध्ये तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला होता.
ऋषी पुरोहित स्वतःला पंतप्रधानांचे मोठा चाहता असल्याचे सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे सर्वात लोकप्रिय नेते आहेत. आजही पंतप्रधान हे गुजरातसह संपूर्ण देशात लहानांपासून मोठ्यांपर्यंत लोकप्रिय नेते ठरलेले आहेत. या सगळ्यात सुरतचा हा पाच वर्षांचा चिमुरडा जेव्हा जेव्हा वेशभूषा स्पर्धा असते तेव्हा प्रत्येक वेळी तो नरेंद्र मोदींच्या गेट-अपमध्ये सहभागी होतो.
एवढेच नाही, ऋषी पुरोहित हा पीएम मोदींचा एवढा मोठा चाहता आहे की, नरेंद्र मोदींनी देशात राबवलेल्या विविध योजनांबद्दल त्याला खडानखडा माहिती आहे. A टू Z मध्ये जेवढी अक्षरे आहेत, त्या सर्व अक्षरांपासून सुरू होणाऱ्या, सरकारच्या विविध योजना तो सलग सांगतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.