आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे ATSची कारवाई:लष्कर - ए - तोयबाच्या अतिरेक्याला बेड्या, दहशतवादी संघटनेत तरुणांची करायचा भरती

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेशमधून अटक तरुणाला रविवारी रात्री पुण्यात आणण्यात आले. - Divya Marathi
उत्तर प्रदेशमधून अटक तरुणाला रविवारी रात्री पुण्यात आणण्यात आले.

लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्याला पुणे दहशवाद विरोधी पथकाने (एटीएस) उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे बेड्या ठोकल्या. त्याला आज पुणे न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात आलेल्या बुलडाण्यातील जुनैद माेहम्मद अता माेहम्मद या तरुणाला पुणे एटीएसने यापूर्वीच अटक केली आहे. आता जुनैद तसेच लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या या तरुणालाही पुणे एटीएसने अटक केलीय. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे ही कारवाई करत इनामुल या तरुणाला ताब्यात घेतले. इनामुल हा जुनैदप्रमाणेच तरुणांना दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी चिथावणी द्यायचा, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

जुनैद कोण?

जुनैद हा मुळचा बुलडाणा जिल्हयातील खामगाव परिसरातील रहिवासी असून दहावी नापास आहे. पुण्यातील दापोडी येथे आपल्या मामाच्या घरी तो 3 ते 4 वर्षांपूर्वी रहावयास आला होता. बेरोजगार असल्याने त्यानेही भंगार व्यवसायाचे काम सुरु केले होते. मात्र, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो दहशतवादी संघटनांकडे आकर्षित झाला. त्यानंतर वेगवेगळ्या फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तो तरुणांना लष्कर-ए-तोयबा संघटनेत भरती करण्याचा प्रयत्न करु लागला होता.

सोशल मीडियावर अ‌ॅक्टिव्ह

सोशल मीडियावरील अशा कारवायांमुळे जुनैद तपास यंत्रणाच्या रडारवर आला होता. काही दिवसांपुर्वीच त्याला पुणे एटीएसने अटक केली होती. आता जुनैद आणि उत्तर प्रदेशमधील इनमुल हक हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. तसेच, इनमुलदेखील जुनैदप्रमाणेच वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना दशहतवादाकडे ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर येत आहे. अधिक चौकशीसाठी एटीएसकडून त्याची कोठडी मागण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...