आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tokyo Olympic Games India Medalist Live Update | Neeraj Chopra, Ravi Dahiya, Mirabai Chanu Bajarang Punia

पदकवीरांचे स्वागत:टोकियोहून परतलेल्या ऑलिम्पिक संघाचे जोरदार स्वागत, सेल्फी घेण्यासाठी गर्दी जमली; विमानतळावरून टीम अशोका हॉटेलमध्ये रवाना

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विमानतळावरच झाली खेळाडूंची कोरोना टेस्ट

टोकियो ऑलिम्पिकमधील चमकते तारे नीरज चोप्रा, रवी दहिया, बजरंग पुनिया, लवलिना बोर्गोहेन आणि टोकियो ऑलिम्पिकमधील पुरुष हॉकीपटू देशात परतले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. ऑलिम्पिक चॅम्पियन्सचे बँड-बाज्यासह स्वागत करण्यात आले. हे सर्व खेळाडू विमानतळावरून थेट अशोका हॉटेलमध्ये जात आहेत. सर्व खेळाडूंचा ताफा हॉटेलकडे रवाना झाला आहे.

चाहते वाट पाहत राहिले, खेळाडू व्हीआयपी गेटमधून बाहेर पडले
ऑलिम्पिक स्टार्सचे स्वागत करण्यासाठी दिल्ली विमानतळावर मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. माध्यमेही पदकविजेत्यांची वाट पाहत होती. ढोल -ताशे आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या जात होत्या.

दरम्यान, जेव्हा चॅम्पियन्सची फ्लाइट लँड झाल्याची बातमी मिळाली तेव्हा लोकांची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचे दिसले. मात्र, सर्व खेळाडूंना सुरक्षा दलांनी रेग्युलर अराइव्हल ऐवजी व्हीआयपी गेटने बाहेर नेले. यामुळे, चॅम्पियन्सचे चाहते आणि मीडिया थोडे निराश झाले.

विमानतळावर नीरजसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी
विमानतळावर नीरजसोबत फोटो काढण्यासाठी गर्दी
दिल्ली एअरपोर्टवर भारतीय पुरुष हॉकी संघाचे गोलकीपर पीआर श्रीजेश (डावीकडून) आणि लवलिना बोरगोहेन (उजवीकडून)
दिल्ली एअरपोर्टवर भारतीय पुरुष हॉकी संघाचे गोलकीपर पीआर श्रीजेश (डावीकडून) आणि लवलिना बोरगोहेन (उजवीकडून)

विमानतळावरच झाली खेळाडूंची कोरोना टेस्ट
दिल्ली विमानतळावर ऑलिम्पिकमधून परतलेल्या सर्व खेळाडूंवर RT-PCR आणि रॅपिड अँटीजन करण्यात आली. यानंतर सर्व खेळाडू अशोका हॉटेलकडे रवाना झाले. अशोक येथे ऑलिम्पिक संघाचे औपचारिक स्वागत केले जाईल. खेळाडूंच्या स्वागतासाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेपासून क्रीडा मंत्रालयापर्यंतचे अधिकारी तैनात आहेत. येथे खेळाडूंसाठी खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात यशस्वी ऑलिम्पिक
भारतीय खेळाडूंनी यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली, जी आतापर्यंतची सर्वोच्च पदके आहेत. यापूर्वी 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी 6 पदके जिंकली होती. नीरज चोप्राने पहिल्यांदाच ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक जिंकले आहे.

खेळाडूंच्या स्वागताची तयारी
खेळाडूंच्या स्वागताची तयारी

तर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य पदक आणि फ्री स्टाइल कुस्तीमध्ये रवी दहियाने 57 किलो वजनी गटात सिल्वर मेडल जिंकले. दुसरीकडे, भारतीय पुरुष हॉकी संघ, फ्रीस्टाइल कुस्तीच्या 65 किलो वजनी गटात बजरंग पुनिया, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि बॉक्सिंगमध्ये लवलिना बोर्गोहेन यांनी कांस्यपदके जिंकली.

बातम्या आणखी आहेत...