आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात बंद होणार टोल नाके:GPS द्वारे होणार टोल टॅक्सची वसुली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जुन्या वाहनांमध्ये सरकारकडून मोफत जीपीएस सिस्टीम लावली जाईल

लवकरच देशातील सर्व टोल नाके बंद होणार असून, प्रत्येक गाडीमध्ये जीपीएस व्यवस्था बसवण्यात येणार आहे आणि त्या आधारे टोलची वसूली करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. लोकसभेतील प्रश्नोत्तराच्या तासामध्ये खासदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते. यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानावर काम सुरू असल्याचेही गडकरींनी यावेळी सांगितले.

GPS द्वारे होईल वसुली

गडकरी म्हणाले की, सध्याच्या टोल पद्धतीला संपवून ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (GPS) द्वारे टोल टॅक्सची वसुली केली जाईल. या अंतर्गत गाडी जितक्या किलोमीटर रस्त्याचा वापर करेल, तितच्या किलोमीटरसाठीच टोल द्यावा लागेल. हायवेवर येण्याची आणि उतरण्याची रेकॉर्डिंग GPS द्वारेच केली जाईल.

याला एका उदाहरणातून समजून घ्या

जर एखादी गाडी एका पॉइंटवरुन हायवेवर चढली आणि 35 किलोमीटरचा प्रवास करुन हायवेवरुन उतरली, तर त्याला फक्त त्या 35 किलोमीटरचा टॅक्स द्यावा लागेल. सध्याच्या व्यवस्थेत प्रत्येक 60 किलोमीटरवर टोल प्लाजा आहे आणि वाहनांना कमीत-कमी 60 किलोमीटरचा टोल द्यावा लागतो.

जुन्या वाहनांमध्ये मोफत लावली जाईल GPS सिस्टीम

संसदेताली प्रश्नोत्तरादरम्यान अमरोहाचे खासदार दानिश कुंवर अली यांच्या प्रश्ना उत्तर देताना गडकरी म्हणाले की, नवीन वाहनांमध्ये GPS कंपनीकडून दिले जातात. जुन्हा वाहनांमध्ये जीपीएस नाही. पण, या नवीन पद्धतीसाठी सरकारकडून जुन्हा वाहनांमध्ये जीपीएस सिस्टीम लावली जाईल.

बातम्या आणखी आहेत...