आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Toolkit Controversy Twitter Update; Congress Demand Action On Piyush Goyal, Giriraj Singh, Smriti Irani, Ravi Shankar Prasad

काँग्रेसने ट्विटरला लिहिले पत्र:म्हटले - स्मृती, रविशंकर प्रसादांसह 11 भाजप नेत्यांच्या पोस्टवर मॅनिपुलेटेड मीडिया टॅगिंग करा, कायदेशीर कारवाई करण्यात यावी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसविरोधात भाजप खोटे पसरवत आहे - काँग्रेस

टूलकिट प्रकरणात आता पत्र लिहिने सुरू झाले आहे. काँग्रेसने ट्विटर इंडियाला पत्र लिहून 11 भाजप नेत्यांच्या पोस्टवर मॅनिपुलेटेड मीडिया टॅगिंग करण्यास सांगितले आहे. काँग्रेसने 11 नेत्यांचे ट्विटही ट्विटरच्या लीगल डिपार्टमेंटला पाठवले आहेत आणि म्हटले आहे की, नेत्यांवर कारवाई करण्यात यावी.

काँग्रेसविरोधात भाजप खोटे पसरवत आहे - काँग्रेस
काँग्रेसने हे पत्र ट्विटरचे लीगल हेड विजया गड्डे आणि लीगल डिपार्टमेंटचे व्हाइस प्रेसिडेंट जिम बेकर यांना लिहिले आहे. ट्विटर इंडियाला दिल्ली पोलिसांच्या नोटीसनंतर अमेरिकेतील ट्विटर हेडक्वार्टरने हे प्रकरण जिम बेकर यांना सोपवले आहे.

कॉंग्रेसने लिहिले आहे- आम्ही यापूर्वी तुम्हाला बनावट टूलकिटबद्दल माहिती दिली होती, जी राजकीय फायदा मिळवण्यासाठी काही भाजप नेत्यांनी चुकीच्या पध्दतीने तयार केली आहे. हे नेते त्यांच्या ट्विटर हँडलवरून कॉंग्रेस आणि नेत्यांविरूद्ध खोटी, बनावट आणि धोकादायक माहिती पसरवत आहेत. आम्ही आपल्याला 25 मे रोजी पाठवलेल्या पत्रात सांगितले होते की मोदी सरकारचे काही मंत्री आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे हे कट रचत आहेत.

आपण आम्हाला या ट्वीटची URL आणि इतर गोष्टींबद्दल विचारले. आम्ही आपल्याला या नेत्यांनी 18 मे रोजी केलेल्या ट्विटसची लिंक पाठवत आहोत. हे चुकीच्या उद्देशाने करण्यात आले होते आणि भारतात खोटे आणि प्रोपेगंडा पसरवण्यासाठी ट्विटरच्या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केला जात आहे.

ट्विटर कारवाई करेल अशी आशा आहे - काँग्रेस
काँग्रेसने म्हटले की, #CongressToolkitExposed हॅशटॅगसह भाजप प्रवक्ता संबित पात्रा यांनी पोस्ट केली होती. अशा प्रकारे इतर नेत्यांनीही पोस्ट केली, जी ट्विटरने मॅनिपुलेटेड मीडिया की-वर्डने टॅग केले आहे. पात्रांविरोधात छत्तीसगढच्या रायपूरमध्ये या प्रकरणाविषयी केसही दाखल करण्यात आली आहे. जर एखाद्या केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या अकाउंटमधून अशी माहिती शेअर केली तर लोक त्याला योग्यच मानतील.

पक्षाने म्हटले आहे की, अशा प्रकारच्या सर्व अकाउंटवरुन केलेल्या ट्विटला मॅनिपुलेटेड मीडिया घोषित करणे गरजेचे आहे. आम्ही आशा करतो की, आम्ही बनावट टूलकिटविषयी ज्या अकाउंट्सचा उल्लेख केला आहे, त्यांच्यावरही अशीच कारवाई करण्यात येईल. जसी कारवाई ट्विटर प्लॅटफॉमचा चुकीच्या पध्दतीने वापर केल्यास केली जाते.

बातम्या आणखी आहेत...