आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Welcome 2021
  • TOP 10 World Achievements; Uk Pfizer Coronavirus Vaccine, Nepal Poor Country Rank, UAE, Hope, Mars Mission

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2020 मध्ये जगातील टॉप 10 अचीव्हमेंट:कोरोनाची व्हॅक्सीन तयार झाली, आफ्रीका पोलिओ मुक्त झाला; कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धडा घ्या, कारण जगाने फक्त मास्कच्या मदतीने कोरोनाचा सामना केला आहे
  • अभिमान बाळगा, कारण कार्बन उत्सर्जन संपवण्यामध्ये मोठे यश मिळाले आहे
  • आनंदी व्हा, कारण 24 किमी अंतरावरुन स्पष्ट चित्र काढण्यात यश मिळाले आहे

वर्ष 2020, ज्यात (कोविड-19)कोरोना व्हायरसने जगभर हाहाकार माजवला. एखादा नाजूक घटनेतून लढून बाहेर आला आणि एखाद्याने आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले. सध्या सर्वांना एकच गोष्ट समजली की, संक्रमणापासून वाचणे, हेच मोठे व्हॅक्सीन आहे. मागील वर्षभरापासून कोरोना आणि व्हॅक्सीन चर्चेत आहे. परंतू, यादरम्यान अनेक मोठे यशही मिळाले आहेत. पाहा जगातील त्या अचीव्हमेंट, ज्या आपल्या समोरुन गेल्या, पण कोरोनामुळे आपल्या नजरेस पडल्या नाहीत.

1. कोरोना पसरला चीनमधून, पण व्हॅक्सीन सर्वात आधी ब्रिटनच्या लोकांपर्यंत पोहचली

जगभर कोरोना चीनमधून पसरला, पण कोरोनाची लस सर्वात आधी ब्रिटनच्या लोकांपर्यंत पोहचली. ब्रिटनमध्ये 8 डिसेंबरपासून व्हॅक्सीनेशनचा प्रोग्राम सुरू झाला आहे. यात 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले नागरिक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वात आधी व्हॅक्सीन दिली जात आहे. ब्रिटनने फायजर-बायोएनटेककडून 8 लाख लस खरेदी केल्या आहेत. येथील चार लाख लोकांना दोन डोज दिले जातील. पहिली लस 90 वर्षीय महिला मारग्रेट कीननला देण्यात आली.

2. अमेरिकन अंतराळवीर क्रिस्टिना कोचने अंतराळात 328 दिवस राहून विक्रम बनवला

अंतराळात 11 महीने घालवल्यानंतर नासाची अंतराळवीर क्रिस्टीना कोच 6 फेब्रुवारीला 2020 ला पृथ्वीवर परत आली. हे आतापर्यंत कोणत्याही महिलेचे सर्वात मोठे अंतराळ मिशन होते. क्रिस्टीनाने इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर 328 दिवस घालवले. यादरम्यान त्यांनी पृथ्वीच्या 5,248 फेऱ्या मारल्या. हे क्रिस्टीनाचे पहिलेच मिशन होते. यात त्यांनी मंगळ मिशन, गुरुत्वाकर्षण, स्पेस रेडिएशन आणि याचे महिलांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला.

3. नेपाळ आता गरीब देश राहिला नाही, 2022 पर्यंत विकसनशील देश बनण्याचे स्वप्न

नेपाळ आता लोअर वरुन लोअर-मिडिल इकोनॉमी देश बनला आहे. जुलैमध्ये जागतिक बँकेने यावर शिक्कामोतर्ब केला. परंतू, कोरोनामुळे नेपाळमधील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम पडला आहे. यादरम्यान, आर्थिक संकटात सापडलेल्या नेपाळला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने 1,584 कोटी रुपयांचा फंड जाहीर केला आहे. संयुक्त राष्ट्राने नेपाळला 2022 पर्यंत विकसनशील देश बनवण्याचे लक्ष्य दिले आहे.

4. जग कोरोनाशी लढत होते, यादरम्यान आफ्रीकेने पोलियओला हरवले

जग मागील वर्षभरापासून कोरोनाशी सामना करत आहे आणि तिकडे आफ्रीकेने पोलिओला हरवले आहे. 25 ऑगस्टला WHO ने याबाबत माहिती दिली. आतापर्यंत आफ्रीका खंडातील नायजेरियामध्येच पोलिओ व्हायरस बाकी होता. आता या देशात मागील चार वर्षांपासून एकही पोलिओचे प्रकरण समोर आले नाही. 1996 मध्ये संपूर्ण आफ्रीकेत 75 हजार मुलांना पोलिओची लागण झाली होती.

5. जवळ आले शत्रू, इस्राइल आणि यूएईदरम्यान झाला ऐतिहासिक शांती करार

कट्टर शत्रू मानल्या जाणार्‍या इस्राइल आणि संयुक्त अरब अमिरात (यूएई) दरम्यान ऑगस्टमध्ये ऐतिहासिक शांतता करार झाला. हा करार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे झाला. 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर इस्राइलचा अरबी देशासोबत झालेला तिसरा शांतता करार आहे. यापूर्वी यूएईने जॉर्डन आणि इजिप्तसोबत शांतता करार केला आहे.

6. स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलमधून पाण्यावर उतरले अमेरिकन अंतराळवीर

अमेरिकेतील खासगी अंतराळ कंपनी स्पेसएक्सचे ड्रॅगन कॅप्सूल 2 ऑगस्टला पृथ्वीवर उतरले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधून पृथ्वीवर येण्यासाठी या कॅप्लुसला 19 तास लागले. 45 वर्षानंतर अमेरिकेच्या स्पेसक्राफ्टने समुद्रावर लँडींग केली. हे मिशन आव्हानात्मक होते, कारण लँडिंगसाठी निवडलेल्या फ्लोरिडाजवळ इसायस सायक्लोनचा इशारा देण्यात आला होता.

7. 24 किमी अंतरावरुन चेंडूचा फोटो घेऊ शकेल अमेरिकेत तयार झालेला 3200 मेगापिक्सलचा कॅमेरा

अमेरिकन शास्त्रज्ञांनी सप्टेंबरमध्ये 3200 मेगापिक्सल असलेला जगातील सर्वात मोठा डिजिटल कॅमेरा तयार केला. या कॅमेऱ्याला कॅलिफोर्नियातील एसएलएसी नॅशनल एक्सीलेरेटर लॅबमध्ये ठेवले आहे. दावा करण्यात येत आहे की, हा कॅमेरा 24 किमी अंतरावरील एका लहानच्या चेंडूचा फोटो घेऊ शकतो. पुढील 10 वर्षात या कॅमेऱ्यातून ब्रह्मांडातील असे फोटो घेतले जातील, ज्यांना आतापर्यंत कोणीच पाहिले नसतील.

8. स्कॉटलँडमध्ये हायड्रोजन फ्यूल सेलचे ट्रायल, वायू प्रदुषण कमी होणार

स्कॉटलँडच्या एबरडीनमध्ये जगातील पहिल्या हायड्रोजन फ्यूल सेलवर चालणाऱ्या डबल डेकर बसची चाचणी झाली. ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या चाचणीचे लक्ष्य, जगातील कार्बन उत्सर्जन कमी करणे आहे. फंडा असा आहे की, कार्बन आणि हायड्रोजनला हवेसोबत मिसळून विज तयार केली जाते. यामुळे एका बसला चार्जिंग करण्यासाठी फक्त 10 मिनीटांचा वेळ लागतो.

9. ​​​​​चीनचे यान चंद्राच्या पृष्टभागावरुन 2 किलोचा चुकडा घेऊन आले, 44 वर्षांपूर्वी नासाने असे केले होते

अमेरिकेच्या अपोलो आणि रशियाच्या लूना मिशननंतर चीन जगातील तिसरा असा देश बनला आहे, ज्याने चंद्राच्या पृष्टभागाचा भाग घेऊन पृथ्वीवर परतला आहे. चीनचे चांग-ई-5 यान 23 नोव्हेंबरला चंद्रावर जाण्यासाठी रवाना झाले होते. हे यान चंद्रावरुन दोन किलोचा तुकडा घेऊन 17 डिसेंबरला पृथ्वीवर आले. याची लँडिंग रात्री मंगोलियात झाली. अमेरिकेच्या अपोलोने 44 वर्षांपूर्वी हा कारनामा करुन दाखवला आहे.

10. भारतीय वंशाची कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला आणि कृष्णवर्णीय उपराष्ट्राध्यक्ष बनल्या

डेमोक्रेटिक पक्षाचे जो बाइडेन अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्ष आहेत. यासोबतच भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी तीन रेकॉर्ड बनवले आहेत. त्या अमेरिक्चाय पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या. या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या साउथ एशियन आणि कृष्णवर्णय आहेत. त्यांच्या आई श्यामला गोपालन भारतीय होत्या तर, वडील डोनाल्ड हॅरिस जमैकाचे होते.

बातम्या आणखी आहेत...