आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Top 15 Industries To Open, Markets Open Only In Green Zones; Measures To Continue Financial Transactions

लॉकडाऊन वाढणार:प्रमुख 15 उद्योग उघडणार, फक्त ग्रीन झोनमध्ये बाजारपेठाही खुल्या; आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्यासाठी उपाययोजना

पतियाळा/ नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
निहंगांनी एएसआयचा हात तोडला, डॉक्टरांनी ७ तासांत जोडला - Divya Marathi
निहंगांनी एएसआयचा हात तोडला, डॉक्टरांनी ७ तासांत जोडला
  • पंजाबमध्ये निहंगांचा पोलिसांवर जीवघेणा हल्ला 50 कमांडोंच्या कारवाईत एक जण जखमी, 11 हल्लेखोर अटकेत

देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढणार हे जवळपास निश्चित आहे. मात्र, या लॉकडाऊनचे स्वरूप कोरोनाच्या रुग्णसंख्येवर ठरेल. यानुसार १५ प्रमुख उद्योग सुरू होतील. ग्रीन झोनमध्ये बाजारपेठाही उघडतील. दरम्यान, लॉकडाऊनमध्ये   पतियाळात (पंजाब) पोलिसांनी पास मागताच पाच सशस्त्र निहंगांनी हल्ला करत एसएसआय हरजितसिंग यांचा हात कापून वेगळा केला. इतर सहा गंभीर जखमी आहेत. या घटनेनंतर आरोपी पळून गेले आणि २५ किमी दूर एका गुरुद्वारात लपून बसले. त्यांना पकडण्यासाठी ५० कमांडोंचे पथक नेमण्यात आले. हे कमांडो गुरुद्वाराजवळ पोहोचताच निहंगांनी पोलिसांवर गाेळीबार केला. कमांडाेंच्या कारवाईत एक जखमी झाला. चार तासांच्या कारवाईनंतर पोलिसांनी एका महिलेसह ११ जणांना अटक केली. निहंगांच्या हल्ल्यात पतियाळाचे एसएसपी मंनदीपसिंग सिद्धू जखमी झाले आहेत. 

निहंगांनी एएसआयचा हात तोडला, डॉक्टरांनी ७ तासांत जोडला

पतियाळा : एएसआय हरजितसिंग यांचा हात तोडून वेगळा केल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीने तो उचलून एएसआय यांच्या हाती दिला. या अवस्थेत सिंग स्वत: रुग्णालयात गेले. तेथून त्यांना चंदिगड येथे तातडीने हलवण्यात आले. चंदिगडमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रयत्नाची शर्थ केली. तब्बल सात तास शस्त्रक्रिया करून तुटलेला हात जोडला. सिंग यांची प्रकृती गंभीर आहे. 

  • लॉकडाऊन शिथिल करताना ३ झोन : रेड, ऑरेंज, ग्रीन

संसर्गाच्या आधारे एखाद्या भागाची कलर कोडिंग होईल, त्याच हिशेबाने लॉकडाऊन होईल शिथिल

नई दिल्ली : १४ एप्रिलनंतर दोन आठवडे लॉकडाऊन राहणार हे निश्चित आहे. मात्र, संसर्गाची स्थिती, भावी धोके, नवे रुग्ण याच्या आधारे लॉकडाऊनमध्ये सूट देण्याचा विचार सुरू आहे. सरकार देशात राज्यांऐवजी संसर्गाचा विचार करून रेड, ऑरेंज, येलो आणि ग्रीन असे विभाग करण्याच्या तयारीत आहे. 

हे बंद : सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक 

हे बंद : सर्व सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा बंद. सिनेमा हॉल, मॉल्स, पार्क, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, शिक्षण संस्था बंद राहतील.

65 वर्षांवरील लोक घरातच...

  • हॉस्पिटॅलिटी : रेड व ऑरेंज झोनमध्ये सर्व हॉटेल, लॉज, गेस्ट हाऊस बंद. ग्रीन आणि येलो झोनमध्ये उघडणे शक्य.
  • परिवहन : ग्रीन व येलो झोनमध्ये लोकल वाहतूक सुरू, मात्र रेड-ऑरेंजमध्ये बंद.
  • उड्डाणसेवा : भारताबाहेर विशेष व कमर्शियल सेवेत सूट. निवडक देशांसाठी मर्यादित सूट. येणारे प्रवासी ७ दिवस निगराणीत.
  • अबकारी : राज्यांना दारू दुकाने व इतर निर्मिती क्षेत्र उघडण्याची मुभा. यात कलर कोडिंग राज्य सरकारे निश्चित करतील.
बातम्या आणखी आहेत...