आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Top Experts Said No Evidence Of Coronavirus Spreading From Water, But Other Disease

गंगेतील मृतदेहांमुळे कोरोना पसरेल का?:टॉप एक्स्पर्ट म्हणाले- पाण्यातून विषाणू शरीरात जाण्याचे पुरावे नाहीत, इतर आजार होऊ शकतात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत गंगा आणि यमुना नदीमध्ये मोठ्या संख्येने मृतदेह दिसून आले आहेत. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे देखील असू शकतात. अशा परिस्थितीत कोरोना पाण्यातूनही पसरतो का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर 'दैनिक भास्कर'ने राजीव गांधी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. बीएल शेरवाल आणि कन्नौज शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक प्रो. मनोज शुक्ला यांच्याशी विशेष संवाद साधला. तुमच्या मनात उद्भवणार्‍या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे आम्ही त्यांच्याकडून जाणून घेतली.

डॉ.बी.एल. शेरवाल : प्रश्न व उत्तरे
पाण्यातून कोरोना पसरतो का?

अद्यापपर्यंत असा कोणताही पुरावा सापडलेला नाही, ज्यावरून असे म्हटले जाऊ शकते की पाण्याने विषाणूचा प्रसार होऊ शकतो. म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोना पाण्यातून पसरणार नाही. परंतु अस्वछ पाणी प्यायलास लोकांना पोटाशी संबंधित काही समस्या नक्कीच उद्भवू शकतात.

व्हायरस शरीरात कसा पोहोचतो?
सर्व अभ्यास आणि संशोधनात असे दिसून आले आहे की,कोरोनाव्हायरस केवळ नाक आणि तोंडातून शरीरात पोहोचतो. हे 99% प्रकरणांमध्ये नाकातून शरीरात पोहोचतो. असे 1% प्रकरण आहेत ज्यात विषाणू तोंडाद्वारे शरीरात जातो. जर हा विषाणू नाकातून आत गेला तर तो थेट फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो, परंतु जर तो तोंडाद्वारे शरीरात गेला तर आतड्यात पोहोचण्याची शक्यता खूप असते.

असे घडल्यास लोकांना अतिसार (डायरिया)सारखे कोविड लक्षणे नक्कीच दिसू शकतात. जर तोंडात फोड आला असेल किंवा व्रण (छाले) असतील तर फुफ्फुसात जाण्याची शक्यता वाढते. फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यानंतर ते मनुष्याच्या शरीरात असलेल्या राइबोसोमच्या मदतीने स्वतःची संख्या वाढवतात.

संक्रमित व्यक्तीस श्वास घ्यायला त्रास का होतो?
हे कोरोनाचे एक नवीन लक्षण आहे. महामारी एका वर्षापेक्षा अधिक जीनी झाली आहे. तरीही नवीन लक्षणे समोर येत आहेत. सर्दी, ताप, खोकल्यापासून सुरु होऊन हे इन्फेक्शन गंभीर निमोनिया आणि श्वासोच्छवासाची समस्या निर्माण करते. अतिसार, चव नसणे, रक्तामध्ये गाठ होणे अशी काही नवीन लक्षणे संशोधकांना या काळात दिसून आली आहेत. यामध्ये सर्वात मोठे लक्षण म्हणजे हॅपी हायपोक्सिया. भारतातील दुसर्‍या लाटेमध्ये तरुणांना याचा सामना करावा लागला आहे.

हायपोक्सिया म्हणजे रक्तातील ऑक्सिजनची पातळी अत्यंत कमी होणे. निरोगी व्यक्तीच्या रक्तात ऑक्सिजन सॅच्युरेशन 95% किंवा यापेक्षा जास्त राहते. परंतु कोरोना रूग्णांमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन 50% पर्यंत पोहोचते. हायपोक्सियामुळे मूत्रपिंड, मेंदू, हृदय आणि इतर प्रमुख अवयव कार्य करणे थांबवू शकतात. सुरुवातीला कोरोना रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ते ठीक आणि 'हॅपी' दिसतात.

प्रो. मनोज शुक्ला : प्रश्न व उत्तरे
हा विषाणू शरीरात किती काळ टिकतो?

विषाणू निर्जीव आहे. जिवंत राहण्यासाठी याला शरीराची आवश्यकता असते. शरीरात पोहोचल्यानंतर, रायबोसोमच्या मदतीने व्हायरस अनेक डुप्लिकेट व्हर्जन तयार करतो. माणसाच्या मृत्यूनंतरही विषाणू अनेक वर्षे शरीरात टिकू शकतात. व्हायरस शून्य तापमानात देखील जिवंत राहतो. व्हायरस शरीरातून निघाला तर जास्तीत जास्त 24 तासात नष्ट होतो.

गंगेमध्ये विषाणूचा अंत होऊ शकतो?
होय, हे नक्कीच शक्य आहे. कारण गंगा नदीमध्ये अँटी-बॅक्टेरियाचे गुणधर्म असल्याचे सर्व अभ्यासानुसार दिसून आले आहे. त्यात व्हायरस आणि बॅक्टेरिया नष्ट करण्याची क्षमता आहे. गंगा हिमालयातून वाहते. अशा परिस्थितीत त्यात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतीचे तत्त्व देखील आहेत. अनेक अभ्यासांमध्ये याची खात्री पटली आहे.

सरकारचे वैज्ञानिक सल्लागार काय म्हणतात?
गंगा व यमुनेतील मृतदेह पाण्यातून कोरोना पसरविण्याच्या प्रश्नावर भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन म्हणतात की, कोरोना विषाणू पाण्यात पसरत नाहीत. म्हणून, कालव्यामुळे, नद्यांना संसर्ग झाल्यामुळे धोका नाही. किंवा तिथं पाणी प्यायल्यामुळे कोणालाही अडचणी येऊ शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...