आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू काश्मीर:पाकिस्तानी दहशतवादी नदीम अबरारसहित 2 दहशतवाद्यांचा खात्मा, ड्रोन हल्ल्यानंतर सर्वात मोठे ऑपरेशन

श्रीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगरच्या पारिंपोरा येथे सोमवारी संध्याकाळपासून सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षादलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये पाकिस्तानी दहशतवादी नदीम अबरार आणि त्याचा स्थानिक साथीदार यांचा समावेश आहे. अबरार हा लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर देखील होता. काल त्याला अटक करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत फक्त एकच दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त होते.

सोमवारी सायंकाळी सहा वाजता सुरक्षादलाने संपूर्ण परिसराला घेराव घातला होता. सर्वप्रथम, स्थानिक लोकांना येथून हलवण्यात आले. चौकशीदरम्यान अबरारने मलूरा येथील एका घऱात एके-47 लपवून ठेवली असल्याचे साांगितले. यानंतर ते शस्त्र जप्त करण्यासाठी अबरारला सोबत नेण्यात आले. त्यानंतर घरात लपून बसलेला त्याच्या साथीदारांनी गोळीबार सुरू केला. यात सीआरपीएफचे 3 कर्मचारी आणि अबरार जखमी झाले. या हल्ल्यात अबरारचा साथीदार मारला गेला. नंतर अबरारचाही मृत्यू झाला.

अबरारच्या अटकेपासून एन्काउंटरपर्यंतचे 10 पॉईंटमध्ये सर्वकाही
1.
पाकिस्तानी दहशतवादी नदीम अबरार याला सोमवारी अटक करण्यात आली .
2. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षादलावर आणि सामान्य नागरिकांवरील अनेक हल्ल्यांमध्ये तो सहभागी होता.
3. नदीम गाडीतून जात असताना त्याला श्रीनगरमध्ये अटक करण्यात आली.
4. कारमधून एक पिस्तूल आणि एक ग्रेनेड जप्त करण्यात आले.
5. चौकशीदरम्यान अबरारने सांगितले की त्याने श्रीनगरमधील मलुरा येथे एका घरात एके-47 लपवून ठेवली आहे.
6. शस्त्र जप्त करण्यासाठी सुरक्षादल त्याला त्या घरात घेऊन गेले.
7. सुरक्षादलाचे सैन्य घरात शिरताच अबरारच्या साथीदारांनी गोळीबार सुरू केला.
8. या चकमकीत CRPF चे 3 जवान जखमी झाले.
9. गोळीबारात अबरार ठार झाला.
10. सुरक्षादलाने अबरारच्या साथीदारालाही ठार केले.

बातम्या आणखी आहेत...