आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आंध्र प्रदेश, केरळसह दक्षिणेतील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. तेलंगणात हैदराबादमध्ये पूरस्थिती असून गेल्या २० वर्षांतील विक्रम पावसाने मोडला आहे. बोवेनपल्ली भागात रस्त्यावर चालणाऱ्या कार पाण्यात तरंगत होत्या. तर बंडलगुडा भागात घरावर दरड कोसळल्याने २ महिन्यांच्या बाळासह ९ जणांचा मृत्यू झाला. या पावसाने तेलंगणात १५ तर आंध्रात ६ बळी घेतले. राज्य सरकारनी सर्व खासगी संस्था, कार्यालये, अनावश्यक सेवांसाठी वर्क फ्रॉम होमच्या सल्ल्यासह गुरुवारपर्यंत सुटी जाहीर केली आहे. पोलिस प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ओडिशातही पावसामुळे गजपतीमध्ये १२ गावांमधील ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलवले.
११७ वर्षांत प्रथमच ऑक्टोबरमध्ये धो-धो
हैदराबादमध्ये मंगळवारपासून बुधवारदरम्यान २४ तासांत २० सेंमी पावसाची नोंद झाली. १९०३ नंतर प्रथमच ऑक्टोबरमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दबावामुळे हा पाऊस पडत आहे.
केरळमध्ये येलो अलर्ट
तेलंगणात हैदराबादसह अनेक ठिकाणी दोन दिवस मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज असून या भागात येलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रातही तीन दिवस काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य प्रदेशातही मुसळधार पावसाचा इशारा आहे.
आठवडाभर मुक्काम
दक्षिण पश्चिम मान्सूनचा देशात आणखी एक आठवडा मुक्काम राहू शकतो. यामुळे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, कर्नाटकसह ९ राज्यांत अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.