आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात ब्रिटेनमधील जास्त धोकादायक कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णांची संख्या वाढून 20 वर गेली आहे. बुधवारी 13 नवीन रुग्ण आढळले. हे कोणत्या प्रदेशातील आहेत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. काल मिळालेल्या सात रुग्णांमधून 1-1 यूप, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मधील आहेत. तर तीन कर्नाटकातील आहेत.
आयसोलेशन सेंटरमधून पळालेल्या महिलेत नवीन स्ट्रेन आढळला
ब्रिटनमधून परतलेल्या आंध्र प्रदेशच्या एका महिलेमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळला आहे. 21 डिसेंबरला दिल्ली एअरपोर्टवर उतरल्यानंतर तिला आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले होते. तिथून पळून ती स्पेशल ट्रेनने आपल्या घरी राजमुंदरीमध्ये पोहोचली होती. महिलेसोबत तिचा मुलगाही होता. दरम्यान मुलाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
9 से 22 डिसेंबरच्या काळात देशात परतलेल्या संक्रमितांचा जीनोम सीक्वेंसिंग आवश्यक
नवीन स्ट्रेन प्रकरण समोर आल्यानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. हेल्थ मिनिस्ट्रीने मंगळवारी सांगितले की, 9-22 डिसेंबरच्या काळात भारतात आलेल्या इंटरनॅशनल पॅसेंजर्स, जे सिंप्टोमॅटिक किंवा संक्रमित आढळले आहेत. त्यांची जीनोम सीक्वेंसिंग अनिवार्य असेल. तसेच 31 डिसेंबरपर्यंत सस्पेंड UK चे उड्डाणही पुढे बंद राहू शकतात. यूनियन एविएशन मिनिस्टर हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले, 'मला वाटते की, सध्या UK च्या फ्लाइट्सचे सस्पेंशन थोडे अजून वाढवावे लागू शकते'
सर्व रुग्ण आयसोलेशनमध्ये
या सर्वांना संबंधीत राज्यांमध्ये राज्य सरकारच्या कोविड सेंटरमध्ये सिंगल रुम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही वेगळे क्वारंटाइन केले आहे. नवीन संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या दुसऱ्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. 25 नोव्हेंबरपासून 23 डिसेंबरच्या काळात ब्रिटनमधून जवळपास 33 हजार प्रवासी भारतात आले आहेत. यामधून आतापर्यंत 114 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. इतर काही सँपल्समध्ये नवीन जीनोम आहेत का याची चाचणी केली जात आहे.
काय आहे जीनोम सिक्वेंसिंग?
जीनोम सीक्वेंसिंग एखाद्या व्हायरसची पूर्ण माहिती आहे. ज्यामध्ये व्हायरसचा पूर्ण डेटा होता. व्हायरस कसा आहे? कसा दिसतो? याची माहिती जीनोममध्ये मिळते. व्हायरसच्या मोठ्या ग्रुपला जीनोम म्हटले जाते. व्हायरसविषयी जाणुन घेण्याच्या प्रोसेसला जीनोम सीक्वेंसिंग म्हटले जाते. याच्या माध्यमातूनच नवीन स्ट्रेनविषयी माहिती घेतली जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.