आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Total Lockdown In Tamil Nadu And Partial In Other States Including Jammu And Kashmir, Restrictions In 18 Other States

लॉकडाऊन:तामिळनाडूत पूर्ण तर जम्मू-काश्मीरसह इतर राज्यांत अंशत: लॉकडाऊन, इतर 18 राज्यांमध्येही निर्बंध

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विवाह, अंत्यसंस्कार, मुलाखती किंवा परीक्षेसंबंधी पुरावा दाखवण्याच्या अटीवर प्रवासाची परवानगी मिळेल

देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी केंद्राकडून लॉकडाऊनसारखे पाऊल उचलण्यात आलेले नाही. परंतु शनिवारपर्यंत देशातील १८ राज्यांत पूर्ण लॉकडाऊन लागू आहे किंवा कडक निर्बंध लागू आहेत. तामिळनाडूने देखील सोमवारपासून पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. १४ दिवस किंवा २४ मेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन असलेले ते १९ वे राज्य असेल.

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री झालेले एम. के. स्टॅलिन यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. अपरिहार्य कारणांमुळे हे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत मिळालेल्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी हे गरजेचे आहे. लॉकडाऊनमध्ये आरोग्य, महसूल, पोलिस, अग्निशमन तसेच बचाव कार्य इत्यादी सेवांना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. आवश्यक कामांसाठी लोकांना प्रवास करण्याची सशर्त सवलत देण्यात आली आहे. खासगी कार्यालये, कंपन्याही बंद असतील. कर्मचारी घरून काम करतील. मंदिर, शाळा, महाविद्यालये व इतर कार्यक्रमांवर बंदी असेल. विवाह, अंत्यसंस्कार, मुलाखती किंवा परीक्षेसंबंधी पुरावा दाखवण्याच्या अटीवर प्रवासाची परवानगी मिळेल.

पूर्ण लॉकडाऊनची राज्ये : दिल्ली, हिमाचल, पंजाब, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड, महाराष्ट्र, आेडिशा, कर्नाटक, गोवा, केरळ, मेघालय, मिझोराम, तामिळनाडू (१० मेपासून)

इतर राज्ये : कर्नाटक : १० ते २४ मेपर्यंत पूर्ण लॉकडाऊन. केरळ : ८ ते १६ मेपर्यंत राजस्थान, १० मे ते २४ मेपर्यंत बिहार, चार ते १५ मेपर्यंत दिल्ली, १९ एप्रिलपासून लॉकडाऊन लागू. १० मेपर्यंत असेल.

वाढ शक्य : महाराष्ट्र : ५ एप्रिलपासून निर्बंध. १५ मेपर्यंत लागू. पंजाब : १५ मेपर्यंत वीकेंड लॉकडाऊन. रात्रीची संचारबंदी. उत्तर प्रदेश : अलीकडच्या निर्बंधांना १० मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय मध्य प्रदेश : १५ मेपर्यंत संचारबंदी, लॉकडाऊन.हरियाणा : ३ मेपासून लॉकडाऊन. १० मेपर्यंत लागू. आेडिशा : ५ मेपासून १९ मेपर्यंत.

बातम्या आणखी आहेत...