आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Total Patient Population At 13.83 Lakhs; For The First Time In The Country, More Than 4 Lakh Tests Were Conducted In 24 Hours, With Over 2 Lakh Patients In Tamil Nadu.

कोरोना देशात:एकूण रुग्णसंख्या 13.83 लाखांवर; देशात पहिल्यांदा 24 तासात 4 लाखांपेक्षा जास्त टेस्ट झाल्या, तमिळनाडुतील रुग्णांचा आकडा 2 लाखांच्या पुढे

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील एकूण मृतांचा आकडा 31 हजार 659 वर, महाराष्ट्रात सर्वाधिक 13 हजार 132 मृत्यू

देशात पहिल्यांदा 24 तासात 4 लाख 20 हजार 898 टेस्ट झाल्या. आता दर 10 लाख लोकसंख्येमागे 11,485 रुग्णांची चाचणी होत आहे. आतापर्यंत 1 कोटी 58 लाख 49 हजार 68 टेस्ट झाल्या आहेत.

यादरम्यान, तमिळनाडुतील संक्रमितांचा एकूण आकडा 2 लाखांच्या पुढे गेला आहे. राज्यात सध्या 2 लाख 6 हजार 737 कोरोना संक्रमित असून, यातील 1 लाख 51 हजार 55 रुग्ण ठीक झाले आहेत. सध्या राज्यात 52 हजार 273 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

13.83 लाख रुग्ण, 31 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

देशातील संक्रमितांची संख्या 13 लाख 62 हजार 262 झाली आहे. यातील 8 लाख 83 हजार 977 रुग्ण ठीक झाले आहेत, तर 32 हजार 082 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4 लाख 66 हजार 693 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी https://www.covid19india.org/ नुसार आहे.