आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटन अनलॉक:पर्यटन क्षेत्र कोरोनापूर्वीच्या स्थितीत; काश्मीरमध्ये पर्यटकांत 88% वाढ

नवी दिल्ली/मुंबई/ मनीषा भल्ला/मनमीत/हारुण रशीद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशभरातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी बहरली

कोरोनामुळे घसरणीला लागलेल्या पर्यटन उद्योगाची स्थिती सुधारत आहे. डिसेंबरमध्ये केरळ, गोवा, काश्मीर, उत्तराखंड, जयपूर, सिमला यांसारख्या पर्यटनस्थळी ८०-९०% हॉटेलमध्ये पर्यटक होते. बहुतांश राज्यांत स्थानिक पर्यटकच आहेत. लोक आपल्या आसपासच्या पर्यटनस्थळी जात आहेत. डिसेंबरमध्ये बुकिंग ट्रेंडच्या आधारावर कंपन्यांनी २०२१ साठी डेस्टिनेशन प्लॅनही बदलले आहेत.

गोव्याच्या कळंगुट बीचवर जॉर्ज फर्नांडिस यांचे एक छोटेसे गेस्ट हाऊस आहे. कोविडमुळे उपाशी राहण्याची वेळ आली आहे, असे ते कोविड काळात सांगत असत. पण आता ते खुश आहेत. आमचे गेस्ट हाऊस ८०% भरलेले असते, असे ते सांगतात. गोवा ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशनचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणाले की, नववर्ष आणि दिवाळीला ९०% पेक्षा जास्त हॉटेल भरलेले होते. थ्री स्टार हॉटेल ७०%, टू स्टार ८०% आणि फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ९५% खोल्या बुक होत्या.

दुसरीकडे, काश्मीरमध्ये स्थिती सामान्य होत आहे. तेथे या वर्षी दशकातील सर्वाधिक बर्फवृष्टी झाली. ख्रिसमस, नववर्षाच्या पार्ट्यांसाठी गुलमर्ग आणि पहलगामसारख्या हिल स्टेशनला गर्दी होती. डिसेंबरमध्ये येथे रोज २ हजारपेक्षा जास्त पर्यटक येत होते. सध्या ही संख्या एक हजार आहे. ८ वर्षांत प्रथमच गुलमर्ग हाऊसफुल आहे. जानेवारीत पर्यटकांचा आकडा २० हजारांवर जाईल, अशी लोकांना आशा आहे. केरळमध्येही वीकेंडला हॉटेलच्या ७०% खोल्या आरक्षित आहेत.

सिमला : जानेवारीत पर्यटकांची संख्या मागील वर्षाएवढीच
अधिकृत आकड्यांनुसार, डिसेंबर २०२० मध्ये ७५ हजार पर्यटक सिमल्याला आले. मात्र, डिसेंबर २०१९ मध्ये १.३० लाख लोक आले होते. जानेवारीत आतापर्यंत ४४ हजार पर्यटक सिमल्याला आले. जानेवारी २०२० च्या पहिल्या पंधरवड्यात ४४ हजार लोक आले होते.

दरमहा ५०% च्या वेगाने वाढत आहे हॉटेलचे बुकिंग : विपुल
माय ट्रिपचे देशातील चीफ ऑपरेटिंग ऑफिसर विपुल प्रकाश यांनी सांगितले की, अनलॉकपासून डिसेंबरपर्यंत दरमहा ५०% च्या दराने हॉटेलचे बुकिंग वाढले आहे. गोवा, जयपूर, उदयपूर, सिमला, मनाली, कुर्ग, उटी आणि पुद्दुचेरी येथे विक्रमी बुकिंगची नोंद झाली आहे.

होम स्टे व सुरक्षित हॉटेलला लोकांचे प्राधान्य
उत्तराखंडमध्ये ७०% बुकिंग ऑनलाइन, सर्व गेस्ट हाऊस फुल
नव्या वर्षात आतापर्यंत उत्तराखंडमधील सर्व ३०१३ हॉटेल, होम स्टे आणि गेस्ट हाऊसचे ७०% बुकिंग ऑनलाइन होत आहे. पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, औलीचे सर्व हॉटेल आणि गढवालचे गेस्ट हाऊस भरलेले आहेत. चकराता, मसुरी, धनौल्टी, नैनिताल, मुक्तेश्वर, मुन्सायरी, सांकरी, हर्षिल यांसारख्या हिल स्टेशनला गर्दी आहे.

८ वर्षांत प्रथमच गुलमर्ग हाऊसफुल आहे
काश्मीरमध्ये ऑक्टोबर २०२० मध्ये २६९७, नोव्हेंबरमध्ये ६३२७ आणि डिसेंबरमध्ये १३२३७ पर्यटक आले. डिसेंबर २०१९ ची तुलना केली तर ही संख्या ८८% जास्त आहे.

बातम्या आणखी आहेत...