आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उंट फेस्टिव्हल:पर्यटकांचे आकर्षण... जगप्रसिद्ध पुष्कर मेळ्यास प्रारंभ

पुष्करएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानातील जगप्रसिद्ध पुष्कर मेळ्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. हा मेळा म्हणजे जगातील पर्यटकांचे आकर्षण आहे. प्रामुख्याने उंट फेस्टिव्हल म्हणून ओळखला जाणाऱ्या या उत्सवात देश-विदेशातील लोकांची गर्दी असते. या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. पुष्कर तीर्थात दीपदान, महाआरती असे कार्यक्रम होतात.

हे आहे वैशिष्ट्य : पुष्कर उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सजवलेल्या उंटांतील कलागुण पाहावयास मिळतात. उंटाचे मालक यासाठी उंटांना प्रशिक्षण देतात. हे उंट पर्यटकांसमोर आपले कौशल्य दाखवतात.

{ देशाच्या कानाकोपऱ्यातून हा उत्सव पाहण्यासाठी पर्यटक भेट देतात. { अजमेरपासून १२ किमी अंतरावर पुष्कर भागात हा उत्सव भरतो. { उंट फेस्टिव्हल म्हणून ओळख असलेल्या या उत्सवात कला व संस्कृतीचा अनोखा संगम पाहावयास मिळतो. { यंदा १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा उत्सव ८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.

बातम्या आणखी आहेत...