आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tourists Drive Car On Karnataka Bridge 2 Days After Gujarat Tragedy, Latest News And Update

झुलत्या पुलावर घातली मारूती कार:मोरबी दुर्घटनेनंतर कर्नाटकातील केबल ब्रिजचा व्हिडिओ व्हायरल, पर्यटक मराठी असल्याचा दावा

बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेमुळे अवघे समाजमन सुन्न झाले असताना आता कर्नाटकातील एका केबल ब्रिजवर मारूती कार चढवण्यात आल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. कर्नाटकच्या उत्तर कन्नडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडिओत?

या व्हिडिओत काही पर्यटक मारूती-800 कार केबल ब्रिजवरून नेताना दिसून येत आहेत. पण गुजरातमधील घटनेमुळे सजग झालेल्या नागरिकांनी त्यांना विरोध केला. यावेळी त्यांच्यात बाचाबाचीही झाली. पण त्यानंतर सदर पर्यटक आपली कार मागे घेताना दिसून येत आहेत. 2 व्यक्ती कारला समोरच्या बाजूने मागे ढकलत असल्याचेही व्हिडिओत दिसून येत आहे. या पुलावर कारसह पर्यटकांचा एक जत्थाही दिसून येत आहे.

विशेष म्हणजे गुजरातमधील दुर्घटनेला अवघे 2 दिवस झाले असताना हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे.

झुलता पूल एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ

उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा स्थित शिवपुरा हँगिंग ब्रिज एक सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी शेजारच्या जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील पर्यटकही पर्यटनासाठी जातात. स्थानिकांनी पुलावर कार घालणारे पर्यटक महाराष्ट्राचे असल्याचा दावा केला आहे. या घटनेची स्थानिक पोलिसांनीही दखल घेतली आहे. ते या प्रकरणी गुन्हाही दाखल करणार आहेत.

गुजरातमधील दुर्घटनेशी संबंधित या बातम्या वाचा ...
मोरबीच्या गुन्हेगारांना अभय:केवळ क्लार्क, गार्ड-मजुरांना अटक.. 'ओरेवा'सह तिचे MD व अधिकाऱ्यांचे नाव FIR मध्ये नाही

गुजरातच्या मोरबीतील पुल कोसळल्याच्या अपघातील बळींचा आकडा 141 वर पोहोचला आहे. यात 50 हून अधिक मुलांचा समावेश आहे. मृत्युच्या या भयावह आकड्यामुळे अनेकांच्या काळजाचे पाणी होत असले तरी आता या घटनेतील खऱ्या गुन्हेगाराना वाचवण्याचा खेळ सुरू झाला आहे. पोलिसांनी सोमवारी या घटनेतील 9 जणांना अटक केली आहे. त्यात ओरेवाच्या 2 मॅनेजर, 2 मजूर, 3 सेक्युरिटी गार्ड व 2 तिकीट क्लर्कचा समावेश आहे.

अपघाताच्या तिसऱ्या दिवशी मोरबीला पोहोचले पंतप्रधान मोदी:अपघातग्रस्तांना भेटण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल गाठले, तुटलेल्या पुलाची पाहणी केली

मोरबी दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मच्छू नदीवरील तुटलेल्या पुलाचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष संघवीही होते आणि त्यांनी अपघाताची माहिती मोदींना दिली. काही वेळाने त्यांनी मोरबी येथील सिव्हिल हॉस्पिटल गाठले. ते तिथे अपघातात जखमी झालेल्या लोकांना भेटत आहेत. अपघातात प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबीयांचीही ते भेट घेणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...