आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलमर्गमध्ये पर्यटकांची गर्दी..:पर्वतशिखरांवर बर्फवृष्टी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र जम्मू-काश्मीरच्या गुलमर्ग येथील स्की रिसॉर्टचे आहे. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गुलमर्ग-जोजिला खिंडीसह खोऱ्यातील अनेक ठिकाणी बर्फाचा तीन इंच थर साचल्याची नोंद झाली. राज्यातील उंच पर्वतशिखरांवर शनिवारी रात्री बर्फवृष्टी झाली. त्यामुळे मुगल रोड व श्रीनगर-लेह महामार्गांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. श्रीनगर, काजीगुंड, पहलगाम, कुपवाडासह १० हून जास्त मैदानी भागात पाऊस झाला. बर्फवृष्टी व पावसामुळे खोऱ्यातील तापमानात घट झाली आहे. गुलमर्गमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. येथील तापमान उणे ३.६ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले. उर्वरित सर्व ठिकाणी पारा शून्याहून वर होता. लडाख, द्रासमध्येही बर्फवृष्टी झाली.

बातम्या आणखी आहेत...