आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंजाबमधील हलवारा एअरबेसची गोपनीय माहिती पाकिस्तानच्या आयएसआयच्या हस्तकाला देणाऱ्या दोन गुप्तहेरांना पोलिसांनी अटक केली. रामपाल सिंग आणि सुखकिरण सिंग ऊर्फ सुक्खा अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा तिसरा जोडीदार हिमाचल प्रदेशचा शब्बीर अली हा फरार आहे.
सुखकिरण सिंग ऊर्फ सुक्खा याचे एअरबेससमोर केशकर्तनालय असून रामपाल सिंग हा एअरबेसवर पेट्रोलियम विभागात डिझेल मेकॅनिक आहे. आरोपींकडून एक पिस्तूल, काडतूस आणि मोबाइल जप्त केला आहे. आरोपींच्या फोनमधून अनेक महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणाची माहिती पोलिसांनी केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणेला दिली आहे. तेही चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी २५ डिसेंबरला सुक्खाला दुकानातून अटक केली होती. त्याच्याकडे शस्त्र आणि डायरी आढळली. त्यात एअरबेसशी संबंधित महत्त्वाची माहिती होती. चौकशीत त्याने रामपालचे नाव घेतले. दोघे शब्बीरच्या मदतीने पाकिस्तानला माहिती पुरवायचे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.